Saturday, June 29, 2024

CWC 2023 Final: अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा टीम इंडियाला सल्ला; म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियाला असं चेचून काढा…’

दिवाळी भाऊबीजेच्या मुहूर्तावर न्यूझीलंडचा 70धावांनी धुव्वा उडवून भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी लढत होणार आहे. 2003 च्या विश्वचषकानंतर आता पुन्हा एकदा तब्बल 20 वर्षांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसमोर येणार आहेत.

यापूर्वी 2003 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा तब्बल 20 वर्षांनी टीम इंडियाची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या अंतिम सामन्याबाबत सिनेविश्वातील कलाकारांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘झिम्मा 2’ फेम अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने (siddharth chandekar) नुकत्याच एका मुलाखतीत विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबाबत आपलं मत मांडलं आहे.

“टीम इंडियाकडून माझी एवढीच इच्छा आहे की, त्या ऑस्ट्रेलियाची अशी वाट लावा ना…2003 चा बदला आपण काही केल्या घेतला पाहिजे. ऑस्ट्रेलियाची टीम पुन्हा भारतात आली नाही तरी हरकत नाही. त्यांना एकदाच धुरूळा करून टाका. ऑस्ट्रेलियाची टीम अंतिम सामन्यात दाखल झाली याचा खरंतर मला प्रचंड आनंद आहे. त्यांची टीम खरंच टफ आहे यात काही शंका नाही. पण, सध्या आपली टीम खूपच भारी क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे आपल्या टीमने ऑस्ट्रेलियाला हरवलंच पाहिजे.” अशी इच्छा सिद्धार्थ चांदेकरने व्यक्त केली आहे.

सिद्धार्थ चांदेकर यांच्यासोबतच गायक सलील कुलकर्णी, झिम्माचा दिग्दर्शक हेमंत ढोमे, गौरव मालनकर, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सायली संजीव, अमृता खानविलकर अशा अनेक कलाकारांनी भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (world cup 2023 final famous actor siddharth chandekar said ndian team take revenge of australia 2003 world cup)

आधिक वाचा-
स्टेजवरच सर्वांसमोर सलमान खानने इमरान हाश्मीला केलं किस?, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल
World Cupफायनल गाजणार, जगाला वेड लावणारी ‘ही’ गायिका पहिल्यांदाच करणार परफॉर्म

हे देखील वाचा