Friday, April 24, 2026
Home बॉलीवूड कंगना पुन्हा एकदा अडचणीत; लेखक आशिष कौल यांनी दाखल केली अवमानना याचिका, पासपोर्ट रिन्यू प्रकरणात खोटे बोलण्याचा आरोप

कंगना पुन्हा एकदा अडचणीत; लेखक आशिष कौल यांनी दाखल केली अवमानना याचिका, पासपोर्ट रिन्यू प्रकरणात खोटे बोलण्याचा आरोप

कंगना रणौत ही बॉलिवूडमध्ये तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या वादांमुळे ओळखू लागली आहे. वाद आणि कंगना हे दोन नाव जणूं एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. तिच्याबाबतीत एक वाद थांबला की दुसरा वाद सुरु होतो. काही महिन्यांपूर्वी कंगनाने सोशल मीडियावर तिच्या आगामी ‘मणिकर्णिका रिटर्न्स : द लिजेंड ऑफ दिड्डा’ या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या घोषणेनंतर काही काळातच लेखक आशिष कौल यांनी या चित्रपटाची कथा त्यांची असल्याचा दावा करत कंगनावर सिनेमाची कथा चोरल्याचा आरोप लावला होता. आशिष यांनी कंगनावर कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप केला आहे.

आशिष कौल यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टात कंगनाच्या विरोधात एक अवमान याचिका दाखल केली होती. आता आशिष कौल यांनी कंगनाचे पासपोर्ट नूतनीकरणासंदर्भात कोर्टात खोटे सांगितल्याचा आरोप केला आहे. याबद्दल आशिष यांचे वकील असणाऱ्या अदनान शेख आणि योगिता जोशी यांनी याप्रकरणी सांगितले, “आम्ही जावेद अख्तर यांना पत्र लिहिले होते आणि त्यांनी आम्हाला या पत्राला दिलेल्या उत्तरातून आम्हाला समजले की, पासपोर्ट अर्जासाठी नमूद केलेले मुद्दे खोटे आहेत. हा एक मोठा गुन्हा आहे. आम्ही आता हा विषय उच्च न्यायालयात मांडणार असून गुन्हा सिद्ध झाला तर त्याचा निकाल समोर येईलच.” (ashish kaul files contempt petition against kangana ranaut)

Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

मागच्यावर्षी जुलैमध्ये एका मुलाखतीदरम्यान कंगनाने जावेद अख्तर यांच्याबद्दल आपत्तीजनक टिपण्णी केली होती. ज्यामुळे जावेद अख्तर यांनी तिच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. कोर्टाने कंगनाला पुढील सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. पुढची सुनावणी १ सप्टेंबरला होणार असून, कोर्टाने कंगनाला धमकीवजा इशारा दिला आहे. जर ती कोर्टात हजर राहिली नाही, तर तिच्याविरूद्ध अटकेचे वॉरंट जारी केले जाईल.

Photo Courtesy : Instagram/kanganaranaut

कंगणाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ती ‘थलाइवी’ सिनेमात जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय सध्या ती ‘तेजस’, ‘धाकड़’ चित्रपटांचे शूटिंग करत आहे. कंगना माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्यावर तयार होणाऱ्या एका सिनेमातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास

-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट

-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट

हे देखील वाचा