Wednesday, July 15, 2026
Home साऊथ सिनेमा प्रसिद्ध यक्षगान कलाकार बलिपा नारायण भागवत यांचे दुःखद निधन

प्रसिद्ध यक्षगान कलाकार बलिपा नारायण भागवत यांचे दुःखद निधन

प्रसिद्ध यक्षगान गायक आणि पटकथा लेखक बलिपा नारायण भागवत यांचे गुरुवारी १६ फेब्रुवारी रोजी कर्नाटक येथे दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ८४ होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे मुलं माधव, शशिधर आणि शिवशंकर आहेत. हे तिघे देखील त्यांच्या वडिलांप्रमाणे यक्षगान पार्श्वगायक आहे. बलिपा नारायण भागवत यांच्या पत्नी जयलक्ष्मी यांचे आधीच निधन झाले आहे.

बलिपा नारायण भागवत यांची मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोविंग आहे. त्यांनी त्यांच्या गायकीच्या अनोख्या शैलीने सर्वांच्या मनात नाव कोरले. बलिपा नारायण भागवत यांनी गायनात एका अनोख्या शैलीमध्ये महारथ मिळवली होती. त्यांच्या या उपलब्धीमुळे त्यांच्या प्रशंसकांनी त्या शैलीला ‘बालिपा शैली’ असे नाव देखील होते. ही शैली इतर गायकांपेक्षा खूपच वेगळी होती. त्यानी त्यांच्या कारकिर्दीमध्ये ३० पेक्षा अधिक यक्षगान प्रसंग लिहिले आहेत.

तत्पूर्वी बलिपा नारायण भागवत यांचा जन्म १९ मार्च १९३८ रोजी केरळच्या कासरगोडच्या पद्रे या गावात झाला. त्यानंतर पुढे त्यांचे कुटुंब मारुरू येथे शिफ्ट झाले. ते यक्षगान करणाऱ्या परिवारातील होते. त्यांनी कतील दुर्गापरमेश्वरी यक्षगान मेळ्यात अनेक वर्ष कलाकार म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी यक्षगान यांच्या अनेक प्रसंगांची रचना करत गीते लिहिली. भागवत यांनी ६० पेक्षा अधिक वर्ष यक्षगान कलेची सेवा केली. त्यांनी सर्वात अधिक पद्रे जाटदारी मेला सुरु केला. त्यांना यक्षगानच्या ५० पेक्षा अधिक प्रसंगांची माहिती होती. ज्यातील ३० प्रसंग प्रकशित झाले होते. कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले होते.

यक्षगान म्हणजे काय?
यक्षगान हा कर्नाटकातील नृत्यनाट्याचा कलाप्रकार आहे. या अभिजात नृत्यनाट्य शैलीमध्ये नृत्य, गायन, अभिनय, वेशभूषा यांचा संगम आहे. कर्नाटकाच्या सांप्रदायिक कलाप्रकारांमध्ये हा प्रमुख कलाप्रकार गणला जातो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदिल तुरुंगात जाताच राखी अन् शर्लिनची पुन्हा झाली मैत्री, पाहा व्हायरल व्हिडिओ
भांड फुटलं रे! स्वरा भास्करने केले समाजवादी पक्षाच्या ‘फहाद अहमद’साेबत लग्न, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा