‘पुन्हा भेटले यारी दोस्तीतील यार दोस्त!’, अभिनेता हंसराज जगतापने केला व्हिडिओ शेअर


मराठी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट बनत आहेत. अनेक नव्या कल्पना, नवे विचार मराठी चित्रपटसृष्टी प्रेक्षकांना द्यायचा प्रयत्न करत आहे. यातील एका आगळ्या- वेगळ्या मैत्रीची परिभाषा मांडणारा चित्रपट म्हणजे ‘यारी दोस्ती’ होय. 2016 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात चार मित्रांची कहाणी दाखवली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला होता. याच चित्रपटातील सगळे कलाकार आता जवळपास 5 वर्षांनी भेटले आहेत. याचाच एक व्हिडिओ या चित्रपटातील कलाकार हंसराज जगताप याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

हंसराजने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ‘यारी दोस्ती’ या चित्रपटातील सगळे कलाकार एकत्र भेटतात. एक-एक करून सगळे येतात. खरंतर ती सगळ्यांसाठी एक अनपेक्षित भेट असते. कोणालाही माहित नसते की, ते सगळे भेटणार आहेत. एक एक येतात आणि इतरांबाबत चुगली करत असतात. सगळेजण फक्त मला सरांनी बोलवले असे म्हणत असतो. इथे त्यांच्यातील मजेशीर संवाद पाहायला मिळत आहे. तसेच त्यांनी चित्रपटाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ते त्यांच्या चित्रपटाच्या गप्पा गोष्टी करताना दिसत आहेत. (Yari dosti movie actors meet after 5 years, actor Hansraj jagtap share video on social media)

हा व्हिडिओ शेअर करून हंसराजने कॅप्शन दिले आहे की, “जेव्हा पुन्हा भेटले यारी दोस्तीतील यार दोस्त.” त्यांचा हा व्हिडिओ अनेक प्रेक्षकांना आवडला आहे. अनेकजण हा चित्रपट खूप छान होता अशी कमेंट करत आहेत.

शंतनू तांबे दिग्दर्शित ‘यारी दोस्ती’ हा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात चार मुलांची कहाणी दाखवली आहेत. जे वेगळ्या आर्थिक परिस्थितीमधून आलेले असतात. त्यांच्यामधील मैत्री आणि त्यांच्या कहाणीत येणारा ट्विस्ट या चित्रपटात दाखवला होता. भावना शाह आणि सारिका तांबे या दोघी या चित्रपटाच्या निर्मात्या होत्या 16 डिसेंबर, 2016 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटात हंसराज जगताप, आकाश वाघमोडे, आशिष गाडे, सुमित बोक्से, नम्रता जाधव, संदीप गायकवाड, मिताली मयेकर, मनीषा केळकर हे कलाकार होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्रा प्रकरणात मराठमोळ्या उमेश कामतच्या फोटोचा वापर, संतप्त अभिनेत्याकडून कारवाईचा इशारा

-आम्ही घेतली कोरोनाची लस! कपिल शर्माने संपूर्ण टीमचे केले व्हॅक्सिनेशन; शो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला

-‘हिचे ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत, आणि…’, म्हणत युजरने केले उर्वशीला ट्रोल; अभिनेत्रीनेही दिले ‘असे’ प्रत्युत्तर


Leave A Reply

Your email address will not be published.