‘हिचे ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत, आणि…’, म्हणत युजरने केले उर्वशीला ट्रोल; अभिनेत्रीनेही दिले ‘असे’ प्रत्युत्तर


सध्याच्या जगात कलाकार आपल्या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या सोशल मीडियामुळे अधिक चर्चेत असतात. जवळपास सर्वच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री उर्वशी रौतेला. उर्वशी रौतेला सध्या इंस्टाग्रामवरील सर्वाधिक फॉलोअर्सच्या शर्यतीत आघाडीवर आहे. जेनिफर एनिस्टर (३७.६ मिलियन), टिकटॉक सेंसेशन एडिसन रे (३८.६ मिलियन) आणि हॅरी स्टाईल्स (३८.९ मिलियन) यांना मागे सोडत तिचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे तिला इंस्टाग्रामवर ३९ मिलियन फॉलोअर्स झाल्याने हे तिच्यासाठी एक सेलिब्रेशनच होते. यासोबतच तिच्यासाठी आणखी एक सेलिब्रेशन होते ते, तिचा पाळीव श्वान (कुत्रा) ऑस्करही एक वर्षाचा झाला. उर्वशीने या सेलिब्रेशनला खास करण्याची संधी सोडली नाही.

उर्वशीने नुकतेच आपल्या या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिले की, “इंस्टाग्रामवर ३९ मिलियन प्रेम मिळाले. सर्वांना माझे प्रेम. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ऑस्कर रौतेला.”

या व्हिडिओत दिसते की, उर्वशीने खूपच रॉयल अंदाजात केक कापला आहे. त्याचसोबत तिच्या रूमचीही सुंदर सजावट पाहायला मिळत आहे.

युजर्सने केले ट्रोल
अशातच उर्वशीच्या या पोस्टवर कमेंट करत एका महिला युजरने तिला ट्रोल केले. तिने लिहिले की, “तिला ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत आणि ती केक कापत आनंद साजरा करत आहे. दुसरीकडे विराट कोहलीचे १३७ मिलियन फॉलोअर्स आहेत, पण तो आनंद साजरा करत नाही.”

उर्वशीने दिले खणखणीत प्रत्युत्तर
उर्वशीने तीन थर असलेल्या गुलाबी केकचा फोटो शेअर करत ट्रोलरला खणखणीत प्रत्युत्तर दिले. तिने लिहिले की, “माफ कर श्रीमती भांडवलकर. मात्र, केक ऑस्करच्या पहिल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा आहे. माझ्यासाठी नाही.” यावरून दिसते की, उर्वशीला ट्रोलर्सचा कोणताही फरक पडत नाही. अशा ट्रोलर्सना कसे प्रत्युत्तर द्यायचे, हे तिला चांगले माहिती आहे. (Actress Urvashi Rautela On Her Video Gave A Strong Reply To The Troll)

Photo Courtesy: Instagram/urvashirautela

‘या’ चित्रपटात झळकणार
उर्वशीच्या आगामी प्रकल्पांबद्दल बोलायचं झालं, तर ती एका तमिळ चित्रपटातून आपले तमिळ पदार्पण करणार आहे. यामध्ये ती मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एका आयआयटीयनच्या भूमिकेत झळकणार आहे. यासोबतच ती एका द्विभाषी थ्रिलरमध्येही दिसणार आहे. उर्वशी जियो स्टुडिओची वेबसीरिज ‘इन्सपेक्टर अविनाश’मध्येही रणदीप हुड्डासोबत मुख्य भूमिकेत आहे, जी सुपर कॉप अविनाश मिश्रा आणि पूनम मिश्राच्या सत्य घटनेवर आधारित एक बायोपिक आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

काय सांगता! ‘बिग बॉस १५’ टीव्हीवर होणार बॅन? सलमान खानने दिली हिंट

-आम्ही घेतली कोरोनाची लस! कपिल शर्माने संपूर्ण टीमचे केले व्हॅक्सिनेशन; शो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला

-प्रिया वारियरचा देशात नाही तर परदेशात डंका! साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर केला भन्नाट डान्स


Leave A Reply

Your email address will not be published.