Wednesday, June 26, 2024

साऊथमधील ‘या’ कलाकरांना 2022 वर्षी लागला मोठा झटका, फ्लॉप झाले ‘हे’ बिगबजट चित्रपट

मनोरंज क्षेत्रामधील 2022 हे वर्ष अनेक कलाकारांना चांगलं गेलं तर काहींना खराब. त्याशिवाय साऊथमधील अनेक चित्रपटांनी धुमाकुळ घातला होता. ‘केजी एफ 2‘, ‘पुष्पा‘, ‘कांतारा‘ सराख्या धमाकेदार चित्रपाटांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती असे म्हणावे लागेल की, 2022 हे वर्ष साउथ चित्रपटांनी गाजवलं. पण काही असेही चित्रपट आहेत ज्यामध्ये सुपरस्टार हिरो असूनही बॉक्सऑफिसवर फार काही चांगली कामगिरी करु शकले नाही. चाला तर आज आपण यावर्षी साऊथमधील फ्लॉप चित्रपटांची यादी पाहूया.

चिरंजीवी
साउथमधील मेगा सुपरस्टारर म्हणुन ओळखले जाणारे लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi)2022 हे वर्ष यांच्यासाठी फार काही चांगले गेले नाही. त्यांच्या दोन चित्रपटांनी या वर्षी चित्रप गृहामध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आले होते मात्र, हे चित्रपट त्यांच्या चाहत्यांना फार काही आवडले नाही. सुरुवातीला ‘आचार्य’ हा चित्रपट प्रदर्शित झाला मात्र, बॉक्स ऑफिसवर पुर्णपणे फ्लॉप ठरला. यानंंतर ‘गॉडफादर‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून यामध्ये सलमान खान (Salman Khan)  यानेही एंन्ट्री केली मात्र, तरिही हा चित्रट प्रेक्षकांची मनं जिंकण्यास अयशस्वी ठरला.

प्रभास
बाहुबली स्टारर प्रभास (Prabhas) या चित्रपटानंतर पॅन इंडिया स्टार बनला आहे. त्यांमुळे अभिनेत्याले भारतभर देशात अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र. 2022 हे वर्ष प्रभाससाठी फार काही चांगलं गेलं नाही. प्रभासचा बिगबजेट चित्रपट ‘राधेश्याम‘ प्रदर्शित झाला मात्र, बॉक्स ऑफिवर पुर्णपणे फ्लॉप ठरला. त्यासोबतच बॉलिवूडमध्येही चित्रपटाला स्वीकारले नाही.

विक्रम
विक्रम हा साउथमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी आहे मात्र, याला देखिल 2022 हे वर्ष फार काही भावले नाही. त्यांचा नवीन बिगबजेट चित्रपट ‘कोबरा’ कडून त्यांना खूप अपेक्षा होत्या मात्र, बॉक्सऑफिवर चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला. कोबरा चित्रपटाचे एकूण बजेट 100 कोटी एवढे होते आणि त्यापैकी चित्रपटाने फक्त 40 कोटीच कमवले.

मोहनलाल
‘जनता गॅरेज’ सुपरस्टारर अभिनेता मोहनलाल (Mohanlal) यांना परिपुर्ण अभिनेता म्हणून ओळखलं जातं. त्यांनी मल्याळम इंडस्ट्रीमधील अनेक गाजणारे चित्रपट केले आहेत मात्र, यावर्षी त्यांचे चित्रपट अयशस्वी ठरले आहेत. चाहत्यांना त्यांच्या नवीन चित्रपाटाची आतुरता लागलेली असते मात्र, यावर्षी त्यांचा ‘अरट्टू’ हा 18 कोटीच्या बजेटमध्ये बनवला होता. मात्र, बॉक्सऑफिवर हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याशिवाय चित्रपट 17 कोटी देखील कमउ शकला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
पैशाची हाव महागात पडते राव! स्क्रिप्ट न वाचताच राजेश खन्नांनी दिलेला चित्रपटाला होकार, पुढे झाली ‘अशी’ फजिती
…म्हणून अपयश पचवण्याची ताकद हवी, चाहते आपल्याला कंटाळलेत कळताच राजेश खन्ना यांना आला होता पॅनिक अटॅक

हे देखील वाचा