Friday, April 18, 2025
Home बॉलीवूड Bye Bye 2022 । बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसाठी हे वर्ष ठरलं खूपच वाईट, काहींनी केली जेलवारी

Bye Bye 2022 । बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसाठी हे वर्ष ठरलं खूपच वाईट, काहींनी केली जेलवारी

वर्ष कसं निघून जातं हे लवकर कळतच नाही. पाहायला गेलं तर 2022 संपण्यासाठी थोड्या दिवसाचाच कालावधी बाकी आहे. मनोरंजन क्षेत्रामधील अनेक कलाकारांना हे वर्ष बऱ्यापैकी चांगल गेलं. चित्रपटगृहामध्येही या वर्षी अनेक धामाकेदार चित्रपट पाहायला मिळाले मात्र, असेही काही चित्रपट होते जे वादाच्या घेऱ्यात अडकले होते. त्याशिवाय काही कलाकारांना चक्क कोर्टाच्या पायऱ्या देखिल चढाव्या लागल्या होत्या. तर आज आपण अशाच कलाकारांची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांनी या वर्षी जेलवारी केली आहे.

रणवीर सिंग
रणवीर सिंग (Ranvir Singh) हा बॉलिवूडमधील कुल आणि एनर्जीफुल अभिनेता म्हणनू ओळखला जातो. सतत आपल्या आगळ्या फॅशेननं प्रेक्षकांवर राज्य करणारा अभिनेता याला आपल्या अतरंगी स्टाइलमुळेट कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या होत्या. त्याने एका मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केल्यामुळे तो खूपच चर्चेत आला होता मात्र, त्यामुळे त्याला अनेक कठीण परिस्थितीचा सामनाही करावा लागला होता.पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदवली होती. त्याच्यावर महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप. केला होता.

हनी सिंग
लोकप्रिय रॅपर आणि गायक हनी सिंग (Honey Singh) हा देखिल त्याची पूर्व पत्नी शालिनी तलवार (Shalini Talwar) हिच्यासोबत घटस्फोट घेण्यासाठी तो एकवर्षापर्यत कार्टाच्या चकरा मारत होता. हनी सिंगने त्याच्या पत्नीला 1 कोटी रुपयाचा चेक पोटगी म्हणून दिला. तिने हनी सिंगवर लैंगिक आणि शारिरिकशोषण सारखे गंभीर आरोप केले होते. त्याशिवाय तिने हनीचे आई-वडील आणि बहिनीवरही आरोप केले होते.

जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी जॅकलिन फर्नांडिस हिला ओळखलं जातं. तिच्याच्यासाठी 2022 हे वर्ष खूपच कठीण परिस्थितीतून गेलं आहे. अभिनेत्रीचे नाव तेव्हा चर्चेत आलं जेव्हा 200 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) सोबत जॅकलिन आणि नोरा फतेही हिचे नाव समोर आले होते. 2021 साली पहिल्यांदा जॅकलिनचं नाव ठगी सुकेशच्या नावासोबत जोडलं गेलं. त्याशिवाय या प्रकरणात नोराचेही नाव समोर आले होते. यनंतर तिनेही जॅकलिनवर मानहानिची तक्रार केली होती.

दलेर मेहंदी
प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांच्या 19 वर्ष जुन्या प्रकरणात पटियाला कोर्टाने त्याची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. विशेष म्हणजे दलेर मेहंदीला मानवी तस्करी प्रकरणी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, नंतर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने 19 वर्ष जुन्या कबुतर शिकार प्रकरणात शिक्षेला स्थगिती दिली. बक्षीश सिंह नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी 2003 मध्ये दलेरविरोधात गुन्हा दाखल केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पक्का पक्का प्यार!’ केतकी माटेगावकर पडली प्रेमात…

चालत्या ट्रेनमध्ये विकी जैनने पकडला अंकिताचा हात; युजर्स म्हणाले, ‘अहो मॅडम! तुमचा फोन…’

हे देखील वाचा