Thursday, June 1, 2023

‘नवरी नटली, काळूबाई सुपारी फुटली’, स्वीटूचा स्वीट डान्स व्हिडिओ पाहिलात का?

‘येऊ कशी तशी मी नांदायला‘ या झी मराठीवरील मालिकेने अनेक वळणं घेतली आहेत. मालिका सुरुवातीला खूप लोकप्रिय होती. परंतु मध्यंतरी मालिकेचा ट्रक काहीसा नकारात्मक दाखवल्याने प्रेक्षक या मालिकेवर मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. स्वीटू आणि ओम हे प्रेक्षकांचे आवडते जोडपे होते. परंतु त्यांची ताटातूट आणि स्वीटूचे लग्न मोहितसोबत झाल्यामुळे प्रेक्षकांनी मालिकेवर राग व्यक्त केला. मालिकेत काही वर्षांचा लीप देखील दाखवला. परंतु याचा काहीच परिणाम झाला नाही, प्रेक्षकांच्या मनातील नकारात्मकता कायम राहिली. अशातच मालिकेचा ट्रॅक चेंज करून आता सगळ्यांची आवडती जोडी ‘स्वीकार’ म्हणजेच स्वीटू आणि ओम पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

खास म्हणजे मालिकेत त्या दोघांचे लग्न दाखवले आहे. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाचा एपिसोड बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक झाले आहेत. अशातच स्वीटूचा लग्नाच्या वेशातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती दिलखुलास डान्स करताना दिसत आहे. (yeu kashi tashi mi nandayala serial sweetu’s dance video viral on social media)

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, स्वीटू लग्नाच्या वेशात दिसत आहे. तिने लाल रंगाची साडी नेसली आहे. तसेच हातात हिरवा चुडा भरला आहे. केसांची वेणी घालून ज्वेलरी घातलेली दिसत आहे. यासोबत तिने डोळ्यांवर चष्मा लावलेला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘नवरी नटली, काळूबाई सुपारी फुटली’ हे गाणे लागले आहे. गाण्यावर स्वीटूचा स्वीट डान्स पाहायला मिळत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

‘येऊ कशी मी नांदायला’ या मालिकेत अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर मुख्य भूमिकेत आहेत. त्यांची जोडी सगळ्यांना खूप आवडते. अन्विता याआधी ‘गर्ल्स’ या मराठी चित्रपटात झळकली आहे. तसेच तिने ‘टाईमपास’ या चित्रपटात केतकी माटेगावकर हिच्या मैत्रिणीचे पात्र निभावले होते.

हेही वाचा :

दिशा पटानीने परिधान केला होता खुप ओपन ड्रेस, एकटक बघतच राहिला शेजारी बसलेला व्यक्ती

विशाल निकम बनला ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा पहिला फायनॅलिस्ट, ‘झोंबिवली’ कलाकारांनी घेतला वेळेचा खेळ

सुमेध मुद्गलकरच्या ‘डान्स महाराष्ट्र डान्स’च्या ऑडिशनला ९ वर्ष पूर्ण, व्हिडिओ घालतोय धुमाकूळ

 

हे देखील वाचा