‘फर्जंद’ चित्रपटात किसना ही व्यक्तीरेखा साकारून अभिनेता निखिल राऊत बराच प्रसिद्ध झाला होता. त्याने ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली. आता अभिनेता ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या लोकप्रिय मालिकेद्वारे दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातील त्याच्या व्यक्तीरेखेला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. याशिवाय अभिनेता सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतो. आता नुकताच समोर आलेल्या त्याच्या एका व्हिडिओमुळे तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
हा व्हिडिओ स्वतः निखिलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये तो अभिनेत्री मीरा जगन्नाथसोबत दिसला आहे. वास्तविक हा एक डान्स व्हिडिओ आहे, ज्यामध्ये हे दोघेही जबरदस्त अंदाजात नाचताना दिसत आहेत. यात तुम्ही पाहू शकता की निखिल आणि मीरा ‘जुडवा’ चित्रपटातील ‘दुनिया में आये’ या गाण्यावर ठुमके लावताना दिसत आहेत.
निखिलने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, डान्ससोबतच त्यांची मस्ती देखील पाहायला मिळत आहे. हेच कारण आहे, ज्यामुळे हा व्हिडिओ इंटरनेटवर सतत पाहिला जात आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये निखिलने ‘वेडेपणा’ असं लिहिलेलं दिसत आहे. हे दोघेही आता ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत झळकत आहेत. शिवाय यातील दोघांची व्यक्तीरेखाही चाहत्यांकडून पसंत केली जात आहे.
निखिल राऊतच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. त्याने ‘तू तिथे मी’, ‘तू माझा सांगती’, ‘काहे दिया परदेस’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. ‘वळू’ चित्रपटात त्याने गण्याचे पात्र साकारत रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवले होते. ‘फर्जंद’, ‘फत्तेशीकस्त’ चित्रपटातील त्याची भूमिका विशेष गाजली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मोठी बातमी! भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादववर गुन्हा दाखल; महिलांबद्दल अश्लील गाणे बनवल्याचा आरोप