Sunday, April 14, 2024

‘आम्ही डान्स करण्याची एकही संधी सोडत नाही’, म्हणत अंतरा आणि मल्हारने लावले ट्रेंडिंग गाण्यावर ठुमके

कलर्स मराठी या वाहिनीवरील एका मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ही मालिका म्हणजे ‘जीव माझा गुंतला.’ मालिका पाहून आता प्रेक्षकांचाच या मालिकेत जीव गुंतला आहे. मालिकेची कहाणी एक वेगळी आणि प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारी आहे. त्यामुळे मालिकेची कहाणी सगळ्यांना भावत आहे. मालिकेत एका सामान्य घरातील मुलीची कहाणी दाखवली आहे. घरात कोणताही पुरुष नसताना ही मुलगी कॉलेज करता करता घराची जबाबदारी घेते. चार पैसे कमावता यावर म्हणून ती रिक्षा चालवते. खरंतर महिला आजकाल कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत. प्रत्येक क्षेत्रात आज त्या कार्यरत आहेत. याची एक झलक या मालिकेत दाखवली आहे.

या मालिकेत सौरभ चौगुले आणि योगिता चव्हाण हे मुख्य भूमिकेत आहेत. ऑनस्क्रीन जरी ते एकमेकांशी एखाद्या शत्रूप्रमाणे भांडत असले, तरी देखील ऑफस्क्रीन यांची मैत्री आणि बॉंडिंग खूप चांगले आहे. मालिकेच्या सेटवरून त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच त्यांचा आणखी एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही ट्रेंडिंग ‘सजना’ या गाण्यावर डान्स करत आहेत. (yogita chavan and sourabh chaugule danve video viral on social media)

योगिताने हा व्हिडिओ अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, योगिताने लाल रंगाचा टॉप आणि जीन्स घातली आहे. तसेच सौरभ पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. ते दोघेही अत्यंत सुंदर पद्धतीने या गाण्यावर डान्स करत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “आम्ही डान्स करण्याची एकही संधी सोडत नाही.” त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. काही जण त्यांच्या डान्सचे कौतुक करत आहेत, तर काहीजण मात्र सौरभला तो मालिकेत अंतराशी इतक्या रागाने का वागतो असा प्रश्न विचारत आहेत.

हेही वाचा :

आई- बाबांच्या ३६ व्या वाढदिवशी श्रिया पिळगावकरकडून झक्कास शुभेच्छा, म्हणाली, ‘तुमच्या पोटी जन्म घेणे…’

अमिताभ बच्चन यांच्या आईने देखील केलंय चित्रपटात काम, पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊया खास माहिती

’83’ सिनेमा पाहिल्यानंतर सुनील शेट्टीने दिली त्याची प्रतिक्रिया, म्हणाला ‘माझे अश्रू थांबवू शकलो नाही’

 

 

हे देखील वाचा