अमिताभ बच्चन यांच्या आईने देखील केलंय चित्रपटात काम, पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊया खास माहिती


चित्रपटसृष्टीतील महानायक अशी ज्यांची ओळख आहे, ते अमिताभ बच्चन यांना आज संपूर्ण दुनिया ओळखते. अशातच मंगळवारी (२१ डिसेंबर) रोजी त्यांच्या आई तेजी बच्चन यांची पुण्यतिथी आहे. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांची सर्वत्र ओळख आहे. परंतु त्यांच्या आईबाबत जास्त कोणालाही माहिती नाही. अनेकजण त्यांच्या आईबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांच्या आईबाबत खास माहिती.

अमिताभ बच्चन यांच्या आई तेजी यांचा जन्म एका पंजाबी शीख कुटुंबात झाला. त्या लाहोरमध्ये मानसशास्त्राचा अभ्यास करत होत्या. त्यावेळी त्यांची भेट इलाहाबाद युनिव्हर्सिटीमधील एका इंग्रजी शिकवणारे प्राध्यपक हरिवंश बच्चन यांच्याशी झाली. त्यांनी १९४१ साली लग्न केले. त्यावेळी प्रेमविवाह करण्यास मान्यता नव्हती, तरी देखील समाजाच्या या चौकटी तोडून त्यांनी तेजी यांच्यासोबत विवाह केला. दोघांनीही संसारात एकमेकांना खूप साथ दिली. (Amitabha Bachchan mother’s death anniversary, lets know about her life)

तेजी बच्चन यांना दोन मुले आहेत. एकाचे नाव अजिताभ बच्चन आणि अमिताभ बच्चन आहेत. तेजी बच्चन यांनी १९७६ साली यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’ या चित्रपटात काम केले. त्यांनी १९७३ साली त्यांना फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये दिग्दर्शक म्हणून काम केले.

तेजी यांची तब्येत ठीक नसल्यामुळे २००७ साली त्यांना लीलावती रुग्णालयात भर्ती केले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले. तेव्हाच त्यांनी जीव गमावला.

तेजी बच्चन यांना थिएटर आणि नाटकामध्ये खूप रस होता. हाती आलेल्या माहितीनुसार त्यांनी एका नाटकात लेडी मॅकबेथ हे पात्र निभावले होते. तेजी बच्चन यांच्या आईचा आणखी एक किस्सा आहे. अमिताभ बच्चन जेव्हा अडीच वर्षाचे होते, तेव्हा ते त्यांच्या आई वडिलांसोबत त्यांच्या मामाच्या घरी लाहोरमध्ये गेले होते. जेव्हा रेल्वे स्टेशनवर तेजी तिकीट घेण्यासाठी गेल्या, तेव्हा अमिताभ बच्चन हात सोडून हरवले होते. त्यानंतर कसे बसे ते सापडले.

अमिताभ बच्चन यांच्या आई त्यांच्या लग्नाच्या आधीचे सूरी हे आडनाव लावत होत्या. त्या एका शीख परिवारातून होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव सरदार खजाना सिंग हे होते. परंतु त्यांनी त्यांच्या मुलांचे पालन पोषण कधीही सरदारप्रमाणे केले नाही.

हेही वाचा :

अश्लील व्हिडिओ प्रकरणाबाबत राज कुंद्राने व्यक्त केली त्याची व्यथा, म्हणाला ‘आरोप सिद्ध होण्यापूर्वीच दोषी ठरवले’

विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडल्याने एंड्रिया जेरेमिया झाली होती डिप्रेशनची शिकार, स्वतःला ‘असे’ सावरले

‘या’ कारणासाठी गोविंदाने चार वर्ष जगापासून लपवले होते त्याचे लग्न, २०१५ साली पुन्हा केले सुनीताशी लग्न

 


Latest Post

error: Content is protected !!