Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड आतुरता संपली! ‘मनिके’ गाण्याचं हिंदी व्हर्जन रिलीज, सिद्धार्थ अन् नाेरावर काैतुकाचा वर्षाव

आतुरता संपली! ‘मनिके’ गाण्याचं हिंदी व्हर्जन रिलीज, सिद्धार्थ अन् नाेरावर काैतुकाचा वर्षाव

काही गाणी अशी असतात जे हृदयाला स्पर्श करून जातात. असेच एक गाणं आहे श्रीलंकन ​​कलाकार योहानी  यांचे. ‘मनिके’ हे गाणं जेव्हा समोर आले तेव्हा कुणालाही वाटले नव्हते की, वेगळ्या भाषेतील हे गाणं लोकांच्या हृदयाला इतके स्पर्श करेल. त्यामुळेच ‘थँक गॉड‘ या आगामी चित्रपटात हे गाणं रिक्रिएट करण्यात आले आहे. हे गाणं लोकांच्या मनात इतकं रुजलं आहे की, रिक्रिएट व्हर्जनच्या व्ह्यूजमध्येही सातत्याने वाढ होत आहे. सध्या या गाण्याला 90 मिलियन व्ह्यूज आले आहेत.

नवीन व्हर्जनवर चर्चा करण्यापूर्वी, पाहिले त्याच्या ऑरिजिनल वर्जन विषयी जाणून घेऊया. हे गाणे योहानी (yohan) आणि सतीशन यांनी 22 मे 2021 रोजी आणले होते. ‘माणिक माघे हित…’ हे दुलन एआरएक्स यांनी लिहिले आहे. हे गाणं श्रीलंकेतील सर्वात हिट गाण्यांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरलं. या गाण्याला आतापर्यंत 232 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे हे गाणे श्रीलंकेतच नव्हे, तर जगभरात हिट झाले. त्याची लोकप्रियता पाहता, त्याचे विविध भाषांमध्ये डबिंग करण्यात आले.

या गाण्याने गायक योहानी या रातोरात स्टार बनल्या. एक खास गोष्ट म्हणजे हे गाणं 2020 मध्ये कोरोनाच्या काळात बनवले गेले होते. मात्र, गाण्याला 2021 मध्ये यूट्यूबवर रिलीज करण्यात आले. हे गाणं सथीशन आणि दुलन यांनी गायले होते. ‘शेप ऑफ यू’ नंतरचे हे सर्वात यशस्वी गाणे ठरले. हे गाणं सप्टेंबर 2021 मध्ये आशियाई संगीत चार्टच्या टॉप 40 गाण्यांमध्ये 8 व्या क्रमांकावर होते.

‘थँक गॉड’ या आगामी चित्रपटात हे गाणं पुन्हा तयार करण्यात आले आहे. निर्मात्यांना माहित होते की, हे गाणं लोकांना आकर्षित करेल आणि असे घडले. आतापर्यंत या गाण्याला 90 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यातील सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि नोरा फतेही यांची केमिस्ट्री लोकांची मने जिंकत आहे. गाण्याचे हिंदी व्हर्जन देखील योहानीनेच गायले आहे. तनिष्क बागची यांनी या गाण्याचे संगीतबद्ध केले असून हिंदी गाण्याचे बोल रश्मी विराग यांनी लिहिले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
पन्नाशी उलटली तरी अबाधित आहे हेमा मालिनींच्या सौंदर्याची जादू आहे, ‘या’ कार्यक्रमात केले सलग दोन तास नृत्य

कंगनाच्या 600 रुपयांच्या साडीचा कहर; म्हणाली, ‘…गुलाम नाही’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा