Saturday, April 20, 2024

करण जोहरने सांगितली त्याची सर्वात मोठी भीती; ‘त्या’ विचारानेच लागतो थरथर कापायला

बॉलिवूडमधील (bollywood) दिग्दर्शक करण जोहर (karan johar)आज आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर आहे. त्याने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. यामध्ये ‘कभी खुशी कभी गम’, ‘कभी अलविदा ना केहना’, ‘स्टुडंट ऑफ द ईअर’, ‘ये दिल है मुश्किल’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. अशात गुरुवारी (दि. 25 मे)ला करण त्याचा 50वा वाढदिवस साजरा करत आहेत. चला, तर मग यानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही रंजक किस्से…

चित्रपट निर्माताव्यतिरिक्त, करण एक महान पिता देखील आहे. करण जोहर त्याच्या दोन मुलांवर खूप प्रेम करतो. करण आपली दोन मुले यश आणि रुहीसोबत बराच वेळ घालवतो. त्याचे संपूर्ण सोशल मीडिया यश आणि रुहीच्या फोटोंनी आणि व्हिडिओंनी भरलेले आहे. करण आपल्या मुलांपासून दूर जाण्याच्या विचाराने देखील थरथरतो कापतो.

अलीकडे त्याला विचारले गेले की, त्याला सर्वात जास्त कशाची भीती वाटते. त्याने प्रत्येक वडिलांप्रमाणे उत्तर दिले की, त्याची सर्वात मोठी भीती आपल्या मुलांपासून दूर राहणे आहे. करण म्हणाला की, “माझी सर्वात मोठी भीती  माझ्या मुलांपासून दूर राहणे ही आहे. माझा जीवनात त्यांच्यामुळेच आनंद आहे. ज्यामुळे मी त्यांच्यापासून जास्त काळ दूर राहू शकत नाही. ”

ही करण जोहरची भीती आहे. तरी देखील करणच्या एनर्जीशी कोणीही मॅच करू शकत नाही. त्यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. करण जोहर प्रत्येक बॉलिवूड पार्टीचा एक भाग असतो. तो पहाटे 4 पर्यंत पार्टीत राहतो. मात्र, तो त्याच्या वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचतो. आजकाल करण त्याच्या नवीन प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहे. करण बऱ्याच काळानंतर पुन्हा दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवणार आहे.

करण लवकरच त्याचा पुढील चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे दिग्दर्शन सुरू करणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहोत. या चित्रपटाबद्दल असे देखील समजले आहे की, या चित्रपटात आपण बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार पाहणार आहोत. त्यामध्ये धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी दिसणार आहेत. करणची संपूर्ण टीम या चित्रपटावर काम करण्यात मग्न आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 2022मध्ये प्रदर्शित होणार आहे.(you will be amazed to read the this fear that karan johar feels in his life)

हे देखील वाचा