Wednesday, February 5, 2025
Home बॉलीवूड ‘ओये होये होये!’ जस्सी गिलच्या नवीन गाण्याची यूट्यूबवर धमाल; चहलच्या पत्नीनेही लावले ठुमके

‘ओये होये होये!’ जस्सी गिलच्या नवीन गाण्याची यूट्यूबवर धमाल; चहलच्या पत्नीनेही लावले ठुमके

प्रेक्षकांमध्ये पंजाबी गाण्याची खूप क्रेझ आहे. बॉलिवूडमध्येही पंजाबी गाण्याची जादू कायम आहे. प्रेक्षकवर्ग जरी इतर भाषिक असला, तरी पंजाबी गाणे तो अगदी आवडीने ऐकतो. हेच कारण आहे, ज्यामुळे पंजाबी गाणे रिलीझ होताच व्हायरल होऊ लागतात.

नुकतेच, पंजाबी गायक जस्सी गिल आणि प्रसिद्ध यूट्यूबर व डान्सर धनश्री वर्मा यांचे ‘ओये होये होये’ हे गाणे रिलीझ झाले आहे. या गाण्यात धनश्रीचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. रिलीझ होताच गाण्याने यूट्यूबवर धमाल केली आहे. गाण्यातील जस्सी गिल आणि धनश्रीची केमिस्ट्री अगदी पाहण्यासारखी आहे.

या गाण्याची खास गोष्ट म्हणजे व्हिडिओमध्ये धनश्री वर्मासोबत जस्सी गिल देखील नाचताना दिसला आहे. धनश्री आज सर्वात लोकप्रिय डान्स इन्फ्लुएंसर बनली आहे.

‘ओये होये होये’ हे गाणे हॅपी रायकोटी यांनी लिहिले आहे आणि अवि सरा यांनी गाण्याला संगीत दिले आहे. या दोघांनीही या गाण्याला परिपूर्ण डान्स पार्टी ट्रॅक म्हटले आहे. या गाण्याला एकाच दिवसात 1 कोटी 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अर्थातच जस्सी गिल आणि धनश्री वर्मा यांच्यातील जुगलबंदी चाहत्यांना खूप आवडल्याचे दिसून येत आहे. यात जबरदस्त डान्ससोबत जोरदार म्युझिक मसालाही घातला गेलाय. त्यांच्या या गाण्याबद्दल चाहते अगोदरपासूनच खूप उत्साही होते. ‘ओये होये होये’ हा म्युझिक व्हिडिओ टी-सीरिजद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याचबरोबर अरविंद खैरा यांनी गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. गाण्याचे शूट एका मोठ्या सेटवर झाले आहे.

धनश्री वर्माने गेल्या वर्षी 22 डिसेंबर रोजी क्रिकेटर युझवेंद्र चहलशी लग्न केले होते. अलीकडेच हे जोडपे मालदीवमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. तिथून धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो आणि डान्स व्हिडिओ शेअर केले. हे डान्स व्हिडिओ बघता बघताच व्हायरल झाले. व्हिडिओमध्ये धनश्री बीचवरील व्यक्तींसह नाचताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सांगलीची मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर दिसली हटके अंदाजात! चाहत्यांकडून फोटोंना जबरदस्त पसंती

-‘भाईजान’ सलमान खानने शब्द पाळला; ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचे पोस्टर केलं रिलीझ

-‘बुसीट चॅलेंज’ फॉलोव करत दीपिका पदुकोणने केला व्हिडिओ शेअर; ‘दीपवीरचा’ निराळा डान्स होतोय व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा