आधी गाणे आणि आता डान्स! गायिका रेणुका पंवारच्या ‘५२ गज का दामन’ गाण्यावरील ठुमक्यांनी चाहते क्लिन बोल्ड

आधी गाणे आणि आता डान्स! गायिका रेणुका पंवारच्या '५२ गज का दामन' गाण्यावरील ठुमक्यांनी चाहते क्लिन बोल्ड


भोजपुरी गाण्यांचा सध्या सर्वत्र धुमाकूळ सुरु असतानाच त्या गाण्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी हरयाणवी गाण्यांनी कंबर कसली आहे. एकीकडे भोजपुरी गाण्यांनी त्यांच्या हटके शब्दांमुळे, संगीतामुळे आपला एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. तर दुसरीकडे हरयाणवी गाण्यांनी देखील त्यांचा एक वेगळा प्रेक्षक तयार केला आहे. हरयाणवी गाणे सुद्धा मागील काही काळापासून लोकप्रिय होताना दिसत आहे.

नुकतेच हरियाणाचे प्रसिद्ध गायिका असणाऱ्या रेणुका पंवार हीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप गाजत आहे. काही दिवसापूर्वीच रेणुकाने तिचे ‘५२ गज का दामन’ हे गाणे प्रदर्शित केले आहे. या गाण्याला तिच्या फॅन्सकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या गाण्याला ३७ करोडपेक्षा जास्त व्युज मिळाले आहेत.

आपल्या आवाजासाठी आणि गाण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या रेणुकाची सध्या वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चा होत आहे. रेणुकाचा एक व्हिडिओ सध्या बराच गाजताना दिसत असून, हा व्हिडिओ आहे तिच्या डान्सचा. हो रेणुकाने तिच्याच गाण्यावर डान्स करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिच्या ‘५२ गज का दामन’ या नवीन गाण्याच्या प्रमोशनसाठी तिने तिचा हा नवीन व्हिडिओ तयार केला आहे.

रेणुकाचे ‘५२ गज का दामन’ हे गाणे ऑक्टोबर २०२० मध्ये प्रदर्शित झाले होते. या गाण्यात अमन जाजी आणि प्रांजल दहिया हे कलाकार असून, मुकेश जाजी यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहे. तर अमन जाजी यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.

रेणुकाची आधी दोन हरयाणवी गाणी प्रदर्शित झाली आहेत. तिचे सपना चौधरीसोबतचे ‘चटक मटक’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले तर आताच काही दिवसांपूर्वी ‘हरियाणवी बीट’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.