तमिळ सुपरस्टार सिद्धार्थला केले मृत घोषित; अभिनेत्याने तक्रार केल्यावर यूट्यूबने दिले हैराण करणारे प्रत्युत्तर


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार सिद्धार्थ हा सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याच्याबाबत काही अशा बातम्या पसरल्या आहेत, ज्यामुळे तो खूपच चिंतेत आहे. यावर सिद्धार्थने ट्वीट करून या अफवा असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना आता कुठे दिलासा मिळाला आहे.

यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात साऊथमधील दहा कलाकारांच्या नावांचा समावेश आहे, जे खूप कमी वयात या जगाला सोडून गेले आहेत. यामध्ये तमिळ अभिनेता सिद्धार्थ याच्या नावाचा देखील समावेश आहे. एका चाहत्याने या व्हिडिओचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री सौंदर्या, आरती अग्रवाल आणि सिद्धार्थच्या नावाचा समावेश आहे. (YouTube video claimed tamil superstar Siddharth is died, actor complaint for it, but YouTube said there is no problem)

अभिनेत्री सौंदर्या हिचा मृत्यू 2004 मध्ये झाला होता, तर आरती अग्रवाल हिचा मृत्यू 2015 साली झाला आहे. परंतु सिद्धार्थ जिवंत आहे. त्याला जेव्हा या बातमीबद्दल समजले, तेव्हा त्याने लगेच यूट्यूबवर रिपोर्ट केला. परंतु यावर यूट्यूबने त्याला जे उत्तर दिले ते ऐकून तुम्ही हैराण व्हाल. यूट्यूबकडून त्याला असे उत्तर मिळाले की, त्यांना या व्हिडिओमध्ये काहीच समस्या दिसत नाहीये.

अभिनेता सिद्धार्थ हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो अनेक बाबींवर त्याचे मत मांडत असतो. त्याने कोरोना काळात देखील लोकांच्या अनेक समस्या मांडल्या होत्या.

सिद्धार्थने याआधी शेवटचे ‘अरुवम’ या चित्रपटात काम केले होते. त्याचा हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याने नुकतेच त्याचा आगामी चित्रपट ‘महा समुद्रम’ ची शूटिंग पूर्ण केली आहे. या सोबतच तो ‘इंडियन 2’, ‘टक्कर’, ‘नवरस’ आणि ‘शैतान का बच्चा’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी रिक्षाचे भाडे देण्यासाठीही नसायचे पैसे; राजपाल यादवने वाईट काळाबद्दल केली मोकळेपणाने चर्चा

-डब्बू अंकल यांचा नवीन डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पुन्हा एकदा जिंकले प्रेक्षकांचे मन

-ओठांच्या सर्जरीमुळे बदलला सलमान खानच्या अभिनेत्रीचा लूक; ‘चेहरा बर्बाद केलास’, म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल


Leave A Reply

Your email address will not be published.