Saturday, April 20, 2024

काय सांगता! नोराने जॅकलीन विरोधात दाखल केला मानहानीचा खटला; म्हणाली, ‘बदनाम करण्याचा प्रयत्न…’

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणी कमी होण्याचे नावच घेत नाहीये. आता नोरा फतेही हिने जॅकलिन फर्नांडिस आणि विविध मीडिया संस्थांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. नोराने तिच्या सहकारी अभिनेत्रीवर आरोप केला आहे की, जॅकलीनने तिला गुन्हेगारी स्वरुपात बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्वीटनुसार, नोरा फतेही (nora fatehi) हिने जॅकलीन फर्नांडिस (jacqueline fernandez) विरुद्ध 200 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला असून, जॅकलीनने सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrasekhar) याच्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दुर्भावनापूर्ण हेतूने तिच्याविरुद्ध खोटी विधाने केल्याचा आरोप केला आहे.

गेल्या महिन्यात तिहार तुरुंगात बंदिस्त सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने दाेघींची चौकशी केली होती. सुकेशने जॅकलिनला करोडो रुपयांचे महागडे गिफ्ट दिले होते. ज्यामध्ये दागिने, घोडा आणि कार इत्यादींचा समावेश आहे. यासोबतच अनेक माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सुकेशने अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना अनेक मौल्यवान भेटवस्तू देखील दिल्या आहेत. त्याचवेळी, सुकेशवर असे आरोप आहेत की, त्याने आदिती सिंग आणि तिच्या बहिणीला फोनवर स्वत:ची ओळख केंद्रीय गृहसचिव आणि कायदा सचिव म्हणून दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री या प्रकरणाची चौकशी आणि तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप करत ईडीने पाटीयाला न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामिनाला विरोध केला होता.

जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘सर्कस’ या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट अनेक रिमेक चित्रपटांचा रिमेक आहे, ज्याने याआधीच प्रेक्षकांचे भरभरुन मनाेरंजन केले आहे. याशिवाय, अभिनेत्री पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या आणखी काही प्रोजेक्टमध्येही दिसणार आहे. (money laundering case actress nora fatehi files defamation case against actress jacqueline fernandez accuses her of making false statements)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
साजिद अन् त्याच्या टिमने अब्दूच्या पाठीवर लिहिला अश्लील संदेश; युजर म्हणाले, ‘लाज वाटली…’

गर्लफ्रेंड टिना थडानीला हनी सिंगने वाढदिवसाच्या दिल्या ‘रोमांटिक’ शुभेच्छा…

हे देखील वाचा