Monday, July 8, 2024

झायरा वसीमने बॉलिवूड इंडस्ट्रीला ठोकला राराम! कारण ऐकूण तुम्ही व्हाल थक्क…

अभिनेत्री झायरा वसीम हिने आपल्या दमदार अभिनयाने घराघरात पोहोचली होती. तिने ‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’ सारख्या चित्रपटामध्ये काम केले होते मात्र, एवढ्यातच या अभिनेत्रीने बॉलिवूड इंडस्ट्रीला रामराम ठोकला. दंगल सारख्या चित्रपटातून प्रसिद्धीच्या मार्गावर जाणाऱ्या अभिनेत्रीने करिअरची पहिला टप्पा पार केला होता. यांनंतर ती सहजच पुढे जाऊ शकली असते मात्र, तिने आपल्या करिअरला पुर्णविराम लावला आहे.

अभिनेत्री झायरा वसीम हिचा जन्म 23 ऑक्टोंबर 2000 रोजी कश्मीरच्या श्रीनगरमध्ये झाला होता. तिने आपले सुरुवातीच शिक्षण कश्मीरमध्येच पुर्ण केले होते. झायराला लहाणपनापासूनच अभिनयाची खूप आवड होती. तिने आपल्या कौशल्यला ओळखून मुंबईला धाव घेतली आणि हिंदी चित्रपटामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. तिने 2015 सली मायक्रोसॉफ्टच्या मोबाईल कंपनीमध्ये फोन आणि टाटा स्कायसारख्या जाहिरातींमध्ये काम केले होते.

झायराने 2016 साली दंगल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने या चित्रपटामध्ये गीता फोगाट हिच्या लहाणपनीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून झायराला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. त्यासोबतच तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाली होता. यंनतर ती आमिर खान सोबत सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटातही झळकली होती, यामध्येही तिची भूमिका चांगलीच गाजली होती. यानंतर झायरा द स्काय इज पिंक या चित्रपटामध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर सोबत दिसली होती. एवढे सगळे चांगले चालत असताना तिने अचानकच अभिनय सोडण्याचा निर्ण सांगितला ज्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

इंडस्ट्री सोडण्यामागे अभिनेत्रीने मोठे कारणही सांगितले आहे. तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना मोठ्या कारणाचा खुलासा केला आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, मी माझ्या कामावर खुश नाही, कारण ते मला माझ्या श्रद्धेपासून लांब घेऊन जात आहे. अभिनेत्री बणल्यामुळे मी इस्लामपासून दूर जात आहे. त्यामुळेच मी चित्रपट इंडस्ट्री सोडत आहे. अभिनेत्रीचा हा निर्णय ऐकूण सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, हा निर्णय पुर्णपने अभिनेत्रीचाच होता. जरी तिने अभिनय क्षेत्र सोडलेले असले तरी ती इंस्टाग्रामवर नेहमी सेक्रिय असते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘सिद्धू’ने 5 वर्षे बघितली होती खऱ्या प्रेमाची वाट, वाचा त्याचा जीवनप्रवास
‘आज माझ्या ‘या’ पहिल्या बॉलिवूड चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण’, म्हणत सिद्धार्थ जाधवने दिला आठवणींना उजाळा

हे देखील वाचा