×

Hijab Controversy | हिजाबच्या वादावर भडकली झायरा वसीम; म्हणाली, ‘…हा अन्याय आहे’

कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादावर कंगना रणौतपासून (Kangana Ranaut) जावेद अख्तरपर्यंत (Javed Akhtar) अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता अशातच अभिनेत्री झायरा वसीमने (Zaira Wasim) पोस्ट केली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवरील बंदीचा निषेध करणारी एक लांबलचक नोट शेअर केली. हिजाब हे देवाचे कर्तव्य आहे असे सांगताना झायरा म्हणाली, “एक स्त्री म्हणून मी कृतज्ञता आणि नम्रतेने हिजाब परिधान करते. मी या संपूर्ण व्यवस्थेला विरोध करते, जिथे महिलांना केवळ धार्मिक बांधिलकी पूर्ण करण्यासाठी रोखले आणि छळले जाते.”

अभिनेत्री झायरा वसीमने २०१९ मध्ये बॉलिवूड सोडले होते. आता अभिनेत्री हळूहळू इंस्टाग्रामवर पुनरागमन करत आहे. अलीकडेच अभिनेत्रीने एका पोस्टमध्ये कर्नाटकी हिजाब वादाबद्दल मत व्यक्त केले. झायराने इंस्टाग्रामवर एक लांब, तपशीलवार नोट शेअर केली, ज्यामध्ये तिने हिजाब बंदी आणि कर्नाटकातील अनेक विद्यार्थिनींना होणाऱ्या छळावर टीका केली.

View this post on Instagram

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_)

झायराने तिच्या नोटमध्ये लिहिले की, “हिजाब घालणे ही निवड आहे हा विचार चुकीचा आहे. सुविधा किंवा अज्ञानामुळे अशी विचारसरणी निर्माण झाली आहे. इस्लाममध्ये हिजाब ही निवड नसून एक बंधन आहे. अल्लाह, ज्याच्यावर ती प्रेम करते आणि ज्याकडे तिने स्वतःला सोपवले आहे, त्याने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी स्त्री हिजाब घालते.”

तिने पुढे लिहिले की, “एक महिला म्हणून मी कृतज्ञता आणि नम्रतेने हिजाब परिधान करते. मी या संपूर्ण व्यवस्थेला विरोध करते, जिथे केवळ धार्मिक बांधिलकीसाठी महिलांना प्रतिबंधित आणि छळले जाते.”

मुस्लिम महिलांनी शिक्षण आणि हिजाब यापैकी एक निवडणे अन्यायकारक आहे, असे सांगत झायरा लिहिते, “मुस्लिम महिलांविरुद्ध हा पूर्वग्रह वाढवून त्यांनी शिक्षण आणि हिजाब यांच्यात निर्णय घ्यावा किंवा एक सोडून द्यावं, अशी व्यवस्था स्थापन केली आहे. हा पूर्ण अन्याय आहे. त्यांना अतिशय विशिष्ट निवड करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

View this post on Instagram

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_)

हे सर्व सक्षमीकरणाच्या नावाखाली केले जात आहे, हे दुःखद असल्याचेही झायरा वसीमने म्हटले आहे.

हेही वाचा :

हेही पाहा-

Latest Post