मौनी रॉयचा ‘हा’ व्हिडिओ पाहून लाखो चाहत्यांच्या काळजात शिरला इश्काचा बाण, एकदा पहाच


बॉलिवूड अभिनेत्री ‘मौनी रॉय’ खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे. टीव्हीवरील छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूडपर्यंत जायला मौनी रॉय हिने खूप मेहनत केली आहे. ती प्रेक्षकांचं मन जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. ती तिच्या मनमोहक‌ अदांनी आणि अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर बनवते. मोनी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असताना दिसते. ती नेहमीच तिचे काही फोटोज् आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून प्रेक्षकांमधे चर्चेत राहते.

मौनी रॉय हिचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घालताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘कितनी हसीन जिंदगी’ या गाण्यावर डोळ्यांचे इशारे करताना दिसत आहे. हा व्हिडीओ मोनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 81 हजार पेक्षाही जास्त वेळा बघितले गेले आहे. या आधी देखील प्रिया वॉरियर हीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. परंतु आता मौनी रॉयचा व्हिडिओ पाहून प्रेक्षक प्रिया देखील विसरून जातील की काय असं वाटतंय. मौनीचे फॅन्स देखील या व्हिडिओला खूप प्रतिसाद देताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये मौनी रॉयने ब्लॅक अँड व्हाइट क्रॉप टॉप आणि डेनिमची जीन्स घातली आहे. या व्हिडीओमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मोनी डोळ्यांचे हावभाव करत आपल्या केसांशी खेळताना दिसत आहे. या व्हिडिओला शेअर करत मोनी रॉय असे लिहते की, “गाणे खूपच आवडले आणि टॉप देखील..”

मौनी रॉय हिने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये तिने पिंक बिकनी घातली होती. हे फोटो देखील सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल झाले होते. तिने टीव्ही सीरियलमध्ये ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’मध्ये काम केले होते आणि अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.