80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. तसेच या पाैराणिक मालिकाची क्रीज त्यावेळी होतीच मात्र 90 च्या दशकात प्रसारित झालेल्या या मालिकेची लोकप्रियता, आजच्या ‘क्रिमिनल जस्टिस’ आणि ‘पाताल लोक’ यांसारख्या हिट मालिकांपेक्षाही खूप जास्त होती.
अशी ही एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘ब्योमकेश बक्षी’. या मालिकेने त्या काळात खुप प्रसिध्दी मिळवली, तर या मालिकेचे लेखक शरदिंदू बंदोपाध्याय यांच्या बंगाली गुप्तहेर कथांवर आधारित आहे आणि जिला शेरलॉक होम्सची भारतीय आवृत्ती मानले जाते. तसेच या मालिकेचा पहिला भाग 1993 मध्ये प्रदर्शित झाला आणि 1996 पर्यंत दूरदर्शनवर प्रसारित झाला. तर आजही प्रेक्षकांना खिळवून ठेवते. तिचा साधेपणा, सखोलता आणि सर्जनशीलता यांमुळे ती देशातील सर्वोत्कृष्ट डिटेक्टिव्ह थ्रिलरपैकी एक ठरते.
या लोकप्रिय रहस्य-थरार मालिकेचे दिग्दर्शन ज्येष्ठ चित्रपट निर्माते बासू चॅटर्जी यांनी केले होते. तसेच यात रजित कपूर (Kapoor)यांनी मुख्य भूमिका साकारली होती. रजित कपूर यांनी या मालिकेत गुप्तहेर ब्योमकेश बक्षीची भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाने हे पात्र जिवंत केले. त्याचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
मुनव्वर फारूकी बनला बाबा, पत्नी मेहजबीनने दिला एका गोड मुलीला जन्म










