Sunday, September 27, 2026
Home › बॉलीवूड › ‘3 Idiots’मधील मिलिमीटर आठवतोय? 14 वर्षांत झालाय हँडसम हंक

‘3 Idiots’मधील मिलिमीटर आठवतोय? 14 वर्षांत झालाय हँडसम हंक

आमिर खान हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आता पर्यत अनेक उत्तम चित्रपट केले आहेत त्यातील अनेक चित्रपट गाजले आणि आजही लोक त्यातील अनेक चित्रपटांना प्रेक्षक विसरले नाहित. पण आमिर खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘3 इडियट्स’मधील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात ताजे आहे. या चित्रपटाने त्या वेळी उत्तम कमाई केली. तर इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमधील तो लहान मुलगा जो रांचो आणि त्याच्या मित्रांचे कपडे इस्त्री करायचा आणि त्यांची छोटी-मोठी कामे करुन द्यायाचा. हे पात्र खुप छोटे असुनही त्यातील त्याचे पात्र प्रेक्षकांच्या मनात आहे.

आमिर (amir)खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘3 इडियट्स’मधील ‘मिलीमीटर’ पूर्णपणे बदलला आहे आणि एक देखणा तरुण बनला आहे.  ‘मिलीमीटर विशेष म्हणजे, 3 इडियट्स’मधील राहुल कुमार.  राहुलची खऱ्या आयुष्यातील प्रेमकथा कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेपेक्षाही अधिक रोमांचक आणि जादुई आहे. राहुल कुमार 13 ते 14 वर्षात खुप बदलला आहे.

राहुल कुमारच्या पत्नीचे नाव केजिबान डोगान असून, ती मूळची तुर्की आहे. त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात अनोखी आहे. केजिबानने सांगितले की, तिने अनेक वर्षांपूर्वी ‘3 इडियट्स’ हा चित्रपट पाहिला होता. आणि त्यातील मिलीमीटर या पात्राने ती खूप प्रभावित झाली होती. चित्रपटाने प्रभावित होऊन तिने राहुलला सोशल मीडियावर मेसेज केला आणि तेव्हापासून त्यांच्यातील संवाद सुरू झाला. जवळपास 14 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. यावर्षी 4 मे रोजी या जोडप्याने लग्न करून आपल्या दीर्घकाळच्या नात्याला एक नवीन नाव दिले.

 

‘महाभारता’मधील कुंती आठवते? तिच्या कारकीर्दीतील संघर्षमय जीवण कहाणी घ्या जाणुन

हे देखील वाचा