Saturday, May 2, 2026
Home बॉलीवूड मुनव्वर फारूकी बनला बाबा, पत्नी मेहजबीनने दिला एका गोड मुलीला जन्म

मुनव्वर फारूकी बनला बाबा, पत्नी मेहजबीनने दिला एका गोड मुलीला जन्म

मुनव्वर फारुकी हा एक स्टँड-अप कॉमेडियन आहे. तसेच तो रिॲलिटी शो ‘बिग बॉस 17’ चा विजेता राहीला आहे. त्यानंतर तो कोणत्याना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत होता. तर आता तो त्याच्या आंनददायी बातमी मुळे चर्चेत आला आहे. मुनवर फारुकीच्या घरी एका नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे. होय, हा स्टँड-अप कॉमेडियन पुन्हा एकदा वडील झाला आहे.  ही बातमी स्वतः मुनवरनेच उघड केली आहे. हा स्टँड-अप कॉमेडियन एका मुलीचा वडील झाला आहे.

मुनव्वरने ही पोस्ट केली असुन त्याने हॉस्पिटलमधील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात मेहजबीन आणि त्याची लाडकी मुलगी दिसत आहेत. या पोस्टमध्ये मेहजबीन किंवा त्याच्या मुलीचा चेहरा दिसत नसला तरी, मुनवरचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. ही पोस्ट शेअर करताना त्याने खुलासा केला की, त्याने आपल्या मुलीचं नाव ‘एख’ ठेवलं आहे. त्याने असेही लिहिले, “घरी आशीर्वाद आला आहे. अल्हम्दुलिल्लाह. कृपया तुमच्या प्रार्थनेत आमची आठवण ठेवा.

मुनव्वर फारुकीने (faruki)उत्तम मंनोरंजनाने आता पर्यत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर बिग बॉस 17ची ट्रॉफी जिंकल्यानंतर काही महिन्यांतच, मुनवर फारुकीने मेकअप आर्टिस्ट मेहजबीन कोतवालाशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. शो दरम्यान मुनवरचे नाव आयेशा खान आणि नाझिला यांच्याशी जोडले गेले होते, पण शोमधून बाहेर आल्यानंतर त्याने अचानक मेहजबीनशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. मुनवर आणि मेहजबीन या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. त्यांनी त्यांचे लग्न खूप खाजगी ठेवले होते आणि बराच काळ त्याची अधिकृत घोषणा केली नव्हती.

‘ये जवानी है दीवानी’ मधील लारा हिचं घर तुटणार? लग्नाच्या 5 वर्षांनंतर एव्हलिन शर्मा घेणार घटस्फोट

हे देखील वाचा