Friday, April 17, 2026
Home हॉलीवूड कान्समध्ये रेड कार्पेटवर पोहोचलेल्या महिलेने स्वतःवर ओतले नकली रक्त, जाणून घ्या काय होते कारण

कान्समध्ये रेड कार्पेटवर पोहोचलेल्या महिलेने स्वतःवर ओतले नकली रक्त, जाणून घ्या काय होते कारण

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कान्समध्ये जगभरातील तमाम स्टार्स सहभागी हाेताना दिसत आहेत. मात्र, याचदरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये असे काही घडले आहे, ज्याबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. रेड कार्पेटवर एका महिलेने स्वतःवर नकली रक्त टाकले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

खरं तर, ही महिला कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये रशियन हल्ल्यात युक्रेनियन सैनिक आणि नागरिकांच्या हत्येचा निषेधार्थ करण्यासाठी आली हाेती. मात्र, महिलेने स्वत:वर नकली रक्त ओतताच तिला तात्काळ रेड कार्पेटवरून बाहेर नेण्यात आले,अशात आता या महिलेच्या व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ही महिला युक्रेनच्या ध्वजाच्या रंगाचा ड्रेस परिधान करून रेड कार्पेटवर पोहोचल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. महिला रेड कार्पेटच्या पायर्‍यांवर काही पावले पुढे जाते आणि कॅमेऱ्याकडे वळून नकली रक्ताचे पॉलिथिन पॅकेट बाहेर काढते आणि स्वतःला लावते. तेव्हाच सुरक्षा रक्षक महिलेला असे करण्यापासून थांबवतो आणि लगेच तिला रेड कार्पेटवरून बाहेर नेताे. यादरम्यान, महिलेच्या चेहऱ्यावर आणि पेहरावावर नकली रक्त लागल्याचे दिसत आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 16 मे पासून सुरू झाला आहे, जो 27 मे पर्यंत चालणार आहे. यावेळी कान्समध्ये अनेक बॉलिवूड सौंदर्यवतींनी हजेरी लावली. यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, सारा अली खान, मौनी रॉय, उर्वशी रौतेला, विजय वर्मा, मानुषी छिल्लर, ईशा गुप्ता यांसारख्या स्टार्सनी रेड कार्पेटवर आपल्या साैंदर्याने सर्वांचे लक्ष वेधले. अशात कान्समधील या सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल हाेत आहे.( 2023 cannes film festival a woman pouring fake blood over herself on red carpet video vira)

हे देखील वाचा