Saturday, November 21, 2026
Home › बॉलीवूड › रामायणची 16 व्या दिवशी बॅाक्स ऑफिसवर जादू, इतक्या कोटींच्या पास पोहचली कमाई

रामायणची 16 व्या दिवशी बॅाक्स ऑफिसवर जादू, इतक्या कोटींच्या पास पोहचली कमाई

अभिनेता रणबीर कपुर अभिनित रामायण या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 2च दिवसांत या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर उत्तम कमाई करण्यास सुरुवात केली आहे. नितेश तिवीर दिग्दर्शित हा चित्रपट असुन याने भारतात 1000 कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. त्याची जगभरातील कमाईदेखील 1500 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. मात्र दुसऱ्या आठवड्याच्या दमदार कामगिरीनंतर आठवड्याच्या दिवसांमध्ये चित्रपटाची कमाई मंदावत असल्याचे दिसत आहे.

सॅकनिल्कनुसार, रामायण चित्रपटाने शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी भारतात 12.22 कोटी कमावले आहेत. यावेळी चित्रपटाने एकुण देशांतर्गत निव्वळ कलेक्शन 875.97 कोटींवर पोहोचले आहे. चित्रपटाने सर्वाधिक कमाई हिंदी शोमधुन केली आहे. तर भारतातील आतापर्यंतचे एकूण ग्रॉस कलेक्शन 1046.57 कोटी आणि एकूण निव्वळ कलेक्शन 875.97 कोटींवर पोहोचले आहे.

रामायण (ramayan)हा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. आणि आता याची कमाई 1600 कोटींच्या टप्प्याच्या जवळ पोहोचत आहे. शुक्रवार, 20 नोव्हेंबरपर्यंत या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 12.22 कोटी कमावले आहेत, ज्यामुळे चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 1563.15 कोटी झाली आहे, ज्यामध्ये परदेशी बाजारपेठांमधून मिळालेल्या 518 कोटींचा समावेश आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट उत्तम कमाई करत अनेक चित्रपटाचे कमाई बाबत रेकाॅर्ड मोडले असुन प्रेक्षकांकडुन खुप प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला आहे. यात रणबीर कपुरने प्रभु रामाची, तर साई पल्लवीने सीतेची आणि यशने रावणाची भुमिका साकारली आहे. तसेच प्रेक्षकांनी रावणची भुमिका साकारणाऱ्या यशचे त्यांच्या उत्तम अभिनयाचे प्रंचड कौतुक केले आहे.

हेही वाचा

रामायण चित्रपटाचा बॅाक्स ऑफिसवर धुमाकुळ, 14 दिवसांत कमाई 1500 कोटींच्या पार

हे देखील वाचा