Sunday, December 8, 2024
Home भोजपूरी भोजपुरी इंडस्ट्रीतील ५ अभिनेत्री, ज्या बॉलिवूड तारकांनाही देतायेत टक्कर

भोजपुरी इंडस्ट्रीतील ५ अभिनेत्री, ज्या बॉलिवूड तारकांनाही देतायेत टक्कर

गेल्या काही दिवसात तुम्ही पाहिलं असेलच की बॉलिवूड, टॉलीवूड इंडस्ट्रीबरोबरच भोजपूरी इंडस्ट्री देखील बरीच चर्चेत असते. यासाठी मुख्य कारण म्हणजे तिथे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री. आपल्या आदांबरोबरच अभिनय आणि मुख्य म्हणजे डान्सने त्यांनी आपली छाप पाडली आहे. अगदी हॉटनेसच्या बाबतीतही त्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर दिलेये. तर, या व्हिडिओमधूनही आपण त्या अभिनेत्रींबद्दलच जाणून घेऊ

या यादीतील पहिलं नाव येतं, मोनालिसा. खरंतर तिचं नाव आहे अंतरा बिस्वास. पण मनोरंजन क्षेत्रात ती मोनालिसा या नावानेच जास्त प्रसिद्ध झाली. ती बिगबॉसमध्ये सामील झाली होती. तसेच टीव्ही मालिकांमध्ये तिने काम केले असून भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये तिचे लाखो चाहते आहेत. तिने बंगाली, कन्नडा, ओरीया, तमिळ, तेलुगू अशा वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्येही काम असले तरी तिला सर्वाधिक यश भोजपूरीमध्येच मिळाले. ती केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही, तर हॉटनेससाठीही प्रसिद्ध आहे, ती अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, त्यावर चाहतेही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियांचा पाऊस पाडत असतात. भोजपूरी इंडस्ट्री मधील ती हायेस्ट पेड अभिनेत्रींपैकी एक देखील आहे…

मोनालिसाप्रमाणेच आम्रपाली दुबे ही देखील भोजपूरीतील प्रसिद्ध अभिनेत्री. २००८ मध्ये सात फेरे: सलोनी का सफर या मालिकेतून ती सर्वांसमोर आली होती. याशिवाय देखील तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यानंतर तिने चित्रपटातही काम केले. तिला भोजपूरी इंटरनॅशनल फिल्म ऍवॉर्डमध्ये पदार्पणातील सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. ती देखील भोजपूरी इंडस्ट्रीतील जानेमाने नाव आहे.

अक्षरा सिंग हिचे नावही या यादीत येतेच. ती देखील हायेस्ट पेड अभिनेत्रींपैकी एक असून २०११ तिच्या अभिनय करियलाच भोजपूरी इंडस्ट्रीतून सुरुवात झाली. तिने आत्तापर्यंत अनेक हिट सिनेमे केलेत. तिने २०२१ च्या बिग बॉस ओटीटीमध्येही भाग घेतला होता. तसेच ती देखील अन्य भोजपूरी अभिनेत्रींप्रमाणेच तिच्या हॉटनेससाठी प्रसिद्ध असून तिलाही लाखो चाहते आहेत. इतकंच नाही, तर ती चांगलं गातेही. तिने काही गाणी गायली देखील आहेत.

प्रसिद्ध भोजपूरी अभिनेत्रींमध्ये राणी चॅटर्जी देखील आहे. खतरों के खिलाडी सारख्या रिऍलिटी शोमध्येही दिसलेली राणीने अनेक चित्रपटांमध्येही काम केलंय. तिने अनेक मोठ्या ऍक्टर्सबरोबर काम केलं असून तिचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवर त्यांचे प्रेम व्यक्त करत असतात. तिने काही काळासाठी ब्रेकही घेतलेला, पण ब्रेकनंतरही तिचा जलवा कायम राहिला. तिला ससुरा बडा पैसेवाला या चित्रपटातून ओळख मिळाली होती. तसेच तिला २०१३ मध्ये भोजपूरी ऍवॉर्ड्समध्ये सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. इतकंच नाही २०१७ साली तिने दादासाहेब फाळके फाऊंडेशनमध्ये देखील सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला आहे.

या यादीतील पाचवे नाव म्हणजे काजल राघवाणी. बिहार आणि युपीमध्ये काजल राखवाणीचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने जवळपास ४० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून तिचे पटना से पाकिस्तान, मुकद्दर हे चित्रपट गाजले आहेत. तिने गुजराती चित्रपटांमध्येही काम केले आहे. काजल अभिनेत्रीबरोबर चांगली डान्सरही आहे.

तर, मंडळी या आहेत काही भोजपूरी अभिनेत्री, ज्या सध्या बॉलिवूडमधील अभिनेत्रींनाही टक्कर देत आहेत. तुम्हाला यातील कोणती अभिनेत्री सर्वात जास्त आवडते, हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महत्त्वाचं दैनिक बोंबाबोंबचे व्हिडिओ पाहायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका…

इथे पाहा व्हिडिओ: Bollywood अभिनेत्रींनाही टक्कर देतात ‘या’ Bhojpuri नट्या | Hot bhojpuri Actress

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा