Monday, September 25, 2023

तारीख आली रे! ‘या’ खास सणादिवशी रिलीज होणार ‘The Vaccine War’ सिनेमा, टीजरही पाहिला का?

कलाविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘द व्हॅक्सिन वॉर: अ ट्रू स्टोरी‘ या त्यांच्या आगामी सिनेमाच्या रिलीजच्या तारखेची घोषणा केली आहे. ही घोषणा त्यांनी ट्विटर किंवा एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून केली आहे. विशेष म्हणजे, दिग्दर्शकाने टीझरद्वारे सिनेमाच्या रिलीजची नवीन तारीख सांगितली आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा सिनेमा पुढील सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. यापूर्वी हा सिनेमा ऑगस्ट महिन्यातच रिलीज केला जाणार होता.

अग्निहोत्रींनी टीजरद्वारे सांगितली रिलीजची तारीख
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी ट्विटरवर लिहिले की, “तारखेची घोषणा: प्रिय मित्रांनो, तुमचा सिनेमा ‘द व्हॅक्सिन वॉर: अ ट्रू स्टोरी’ येत्या 28 सप्टेंबर, 2023 रोजी जगभरात रिलीज होणार आहे. कृपया आम्हाला आशीर्वाद द्या.”

यापूर्वी त्यांनी 13 ऑगस्ट रोजी विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट केले होते. त्यात त्यांनी लिहिले होते की, “अखेर, द व्हॅक्सिन वॉर पूर्ण झाला. हा भारताचा पहिला बायो-सायन्स सिनेमा आहे. आता हा केव्हा रिलीज होणार असा प्रश्न आहे?”

सिनेमातील कलाकार
विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) या सिनेमात तगडी स्टारकास्ट असणार आहे. या सिनेमात अनुपम खेर, नाना पाटेकर, रायमा सेन आणि अग्निहोत्री यांच्या पत्नी तसेच अभिनेत्रीपल्लवी जोशी यांच्यासह इतर कलाकारांचाही समावेश आहे.

सिनेमा रिलीज करण्यात का झाला उशीर?
यावर्षी जून महिन्यात सिने निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी आगामी सिनेमाच्या शेवटच्या रिलीज तारखेविषयी घोषणा केली होती. त्यांनी म्हटले होते की, हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे. पूर्वी असा अंदाज लावला जात होता की, रिलीजची तारीख यावर्षी 15 ऑगस्टवरून दसऱ्याच्या दिवशी 24 ऑक्टोबर अशी केली गेली होती.

विवेक यांनी शेवटच्या शेड्यूलच्या शूटची काही झलक ट्विटरवर शेअर केली होती. तसेच, त्यांनी म्हटले होते की, “आई सरस्वतीच्या आशीर्वादाने, द व्हॅक्सिन वॉरच्या शेवटच्या शेड्यूलची सुरुवात झाली आहे.”

‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाविषयी
‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नोव्हेंबर, 2022मध्ये त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाची घोषणा केली होती. या चित्रपटाबद्दल फारसे काही उघड झाले नसले तरी, ‘द व्हॅक्सिन वॉर’मुळे ‘भारतीय जैव-शास्त्रज्ञ आणि स्वदेशी लसींबद्दल काही प्रकरणे उघडण्याची’ शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, हा सिनेमा कोव्हिड-19 महामारीच्या अनिश्चित काळात वैद्यकीय बंधुत्व आणि शास्त्रज्ञांच्या समर्पणालाही ट्रिब्यूट देतो. (director vivek agnihotri announces the vaccine war release date teaser)

महत्त्वाच्या बातम्या-
‘Gadar 2’रिलीज झाल्यानतंर रात्रभर ढसाढसा रडत अन् खदाखदा हसत होता सनी देओल, स्वत:च केला खुलासा
अक्षयच्या ‘OMG 2’ने सोमवारी ओलांडला ‘एवढ्या’ कोटींचा आकडा, ‘ओपनिंग डे’पेक्षा जास्त केलीये कमाई

हे देखील वाचा