Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड अक्षयच्या ‘OMG 2’ने सोमवारी ओलांडला ‘एवढ्या’ कोटींचा आकडा, ‘ओपनिंग डे’पेक्षा जास्त केलीये कमाई

अक्षयच्या ‘OMG 2’ने सोमवारी ओलांडला ‘एवढ्या’ कोटींचा आकडा, ‘ओपनिंग डे’पेक्षा जास्त केलीये कमाई

सनी देओल याचा ‘गदर 2‘ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त्त कमाई करताना दिसत आहे. मात्र, असे असूनही अक्षय कुमार याचा ‘ओएमजी 2‘ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तग धरून आहे. तसेच, शानदार कमाईसुद्धा करत आहे. या सिनेमाने ओपनिंग डेला ठीक-ठाक कमाई केली होती. मात्र, वीकेंडला ‘ओएमजी 2’ सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. तोच आता सिनेमाची कमाई चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. चला तर, ‘ओएमजी 2’ सिनेमाची सोमवारची (दि. 14 ऑगस्ट) कमाई कशी होती, जाणून घेऊयात…

‘ओएमजी 2’ने सोमवारी किती छापले?
अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ओएमजी 2’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या सिनेमाने एकूण 3 दिवशी 43 कोटी रुपये कमावले आहेत. तोच आता या सिनेमाने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. रंजक बाब अशी की, शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी सिनेमाने चांगली कमाई केली आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘ओएमजी 2’ सिनेमाने सोमवारी 12.06 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर अक्षय कुमारच्या सिनेमाच्या एकूण चार दिवसाची कमाई 55.17 कोटी रुपये झाली आहे. खरं तर, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर ‘ओएमजी 2’ सिनेमा 2023चा दुसरा सिनेमा आहे, ज्याने सोमवारी शुक्रवारपेक्षा जास्त कमाई केली आहे.

अक्षय कुमारच्या बुडत्या कारकीर्दीला संजीवनी देणार ‘ओएमजी 2’
सलग 5 फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर ‘ओएमजी 2’ सिनेमा अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या कारकीर्दीसाठी खूपच महत्त्वाचा बनला आहे. खरं तर, अक्षयचे फ्लॉप सिनेमांचे सत्र आता ‘ओएमजी 2’मुळे तुटले आहे. जर या सिनेमाला अ प्रमाणपत्र मिळाले नसते आणि ‘गदर 2’ सिनेमाशी टक्कर झाली नसती, तर नक्कीच ‘ओएमजी 2’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आणखी जास्त कमाई केली असती. (omg 2 box office collection day 4 akshay kumar film monday collction more than friday know here)

महत्त्वाच्या बातम्या-
थांबतच नाहीये ‘Gadar 2’ची सुपरफास्ट एक्सप्रेस! चौथ्या दिवशीही बक्कळ कमाई करत भल्याभल्या सिनेमांना पछाडले
Bigg Boss OTT 2 Winner: एल्विश यादवने विजेतेपद पटकावत घडवला इतिहास, ट्रॉफीसोबत जिंकले ‘एवढे’ लाख

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा