Friday, March 29, 2024

९५ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर, पाहा कोण कोण आहे पुरस्कारांच्या शर्यतीत ?

चित्रपटांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांची प्रत्येक सिनेप्रेमी वाट बघत असतो. आपल्या कलाकृतीला ऑस्कर पुरस्कार मिळावी ही प्रत्येक चित्रपट निर्मात्याची आणि दिग्दर्शकाची अपेक्षा असते. भारतीय कलाकृतीसाठी ऑस्कर पुरस्कार तसा दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. दरवर्षी एखाद्या कलाकृतीबद्दल ऑस्करला जाण्यासारखी कलाकृती असे म्हटले जाते मात्र दुर्दैवाने तसे घडत नाही. यावर्षी मात्र ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ही कमतरता भरून काढली असून, सर्वोत्कृष्ट गाण्याच्या विभागात नामांकन मिळाले आहे. संपूर्ण देशासाठी या नामांकनामुळे आनंद निर्माण झाला आहे. लवकरच ९५ वे ऑस्कर पुरस्कार संपन्न होणार असून, या पुरस्कारांमध्ये कोणकोणत्या कलाकृतींना कोणत्या विभागात नामांकन मिळाले आहे ते जाणून घेऊया.

सर्वोत्कृष्ट सिनेमा (Best Picture)
अवतार : द वे ऑफ वॉटर Avatar : The Way Of Water
थार Tar
द बेंचेस ऑफ इनशेअरिन The Banshees Of Inisherin
एलविस Elvis
एवरीथिंग एवरीवेयर ऑल अॅट वन्स Everything Everywhere All at once
द फेबलमन्स The Fabelmans
टॉप गन मेव्हरिक Top Gun Maverick
ट्रिंगल ऑफ सॅडनेस Triangle Of Sadness

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best Actress)
कॅटे ब्लेनचेट Cate Blanchett (थार)
अॅना दे अर्मास Ana De Armas (ब्लोन्ड)
Andrea Riseborough Andrea Riseborough (To Leslie)
मिचेले व्हिल्यम्स Michelle Williams

सर्वोत्कृष्ट अभिनेता (Best Actor)
ऑस्टिन बस्टलर (Austin Butler)
कोलिन फरेल (कोलिन फरेल)
ब्रेडन फ्रासर (Brendan Fraser)
पौल मस्कल (Paul Mescal)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
ब्रिंडैन ग्लीसन (द बंशीज ऑफ इनिशरिन)
ब्रायन टायरी हेनरी (कॉजवे)
जुड हिर्श (द फेबलमैंस)
बॅरी कियोघन (द बंशीज ऑफ इनिशरिन)
की हुई क्वान (एव्रीथिंग एव्रीवेयर ऑल एट वन्स)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
एंजेला बैसेट (ब्लैक पैंथर: वकांडा फॉरेवर)
हांग चाऊ (द व्हेल)
कॅरी कॉन्डन (द बंशीज ऑफ इनिशरिन)
जेमी ली कर्टिस (एव्रीथिंग एव्रीवेयर ऑल एट वन्स)
स्टैफनी एचएसयू (एव्रीथिंग एव्रीवेयर ऑल एट वन्स)

सर्वोत्कृष्ट माहितीपट (Documentry Feature)
ऑल दॅट ब्रीथ्स (All That Breathes)
ऑल द ब्यूटी अॅन्ड द ब्लडशेड (All The Beauty And The Bloodshed)
फायर ऑफ लव्ह (Fire Of Love)
अ हाऊस मेड ऑफ स्पील्नटर्स (A House made Of Splinters)

मूळ पटकथा (Original Screenplay) :
द बॅनशीस ऑफ इनशिरिन (The Banshees Of Inisherin)
एवरीथिंग एवरीवेयर ऑल अॅट वन्स (Everything Everywhere All at once)
ट्रॅंगल ऑफ सॅडनेस (Traingle Of Sadness)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हनीमूनबाबत फॅनने शाहरुखला विचारला हा अजब प्रश्न, किंग खानच्या उत्तराने चाहत्याची बोलतीच बंद

शाहरुखचा जुना फोटो पोस्ट करून त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न, पाहा कसे दिले अभिनेत्याने चोख प्रत्युत्तर

हे देखील वाचा