Tuesday, June 10, 2025
Home साऊथ सिनेमा एकीकडे कोर्टाची नोटीस, तर दुसरीकडे कोरोनाची लागण; संकटात सापडले ‘हे’ दिग्दर्शक

एकीकडे कोर्टाची नोटीस, तर दुसरीकडे कोरोनाची लागण; संकटात सापडले ‘हे’ दिग्दर्शक

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी लगेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अद्याब याबाबत अधिक माहिती समोर आली नाहीये. त्यांची पत्नी सुहासिनी यांनी त्यांच्याबाबत काहीही सांगितले नाहीये. मणिरत्नम हे त्यांच्या आगामी ‘पोन्नियिन सेल्वन’ या सिनेमामुळे चांगलेच चर्चेत आहेत.

वैद्यकीय रिपोर्ट्स
दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच ८ जुलै रोजी मणिरत्नम (Mani Ratnam) हे ‘पोन्नियिन सेल्वन’ या सिनेमाच्या टिझर लाँचवेळी दिसले होते. ते सध्या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनमध्ये व्यस्त आहेत. मात्र, अशातच ते कोरोना पॉझिटिव्ह (Mani Ratnam Corona Positive) आढळल्याचे वृत्त समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना चेन्नई येथील अपोरोल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप रुग्णालय आणि डॉक्टरांनी मणिरत्नम यांचे वैद्यकीय रिपोर्ट्स जाहीर केले नाहीयेत.

मणिरत्नम यांना न्यायालयाकडून नोटीस
एकीकडे मणिरत्नम यांना कोरोनाची लागण झाली आहे, तर दुसरीकडे त्यांचा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. न्यायालयाने दिग्दर्शक मणिरत्नम आणि अभिनेता विक्रम यांना नोटीस पाठवली आहे. निर्मात्यांवर असा आरोप आहे की, त्यांनी चोल साम्राज्याची कहाणी चुकीच्या पद्धतीने दाखवली आहे. हा सिनेमा भारतावर १५०० वर्षांपर्यंत राज्य करणाऱ्या चोल वंशाची कहाणी दाखवणार आहे. वकिलांनी सिनेमात ऐतिहासिक तथ्यांची तपासणीसाठी एका स्पेशल स्क्रीनिंगची मागणी केली आहे.

‘पोन्नियिन सेल्वन’ सिनेमात झळकणार ‘हे’ कलाकार
मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ हा सिनेमा येत्या ३० सप्टेंबर रोजी विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, त्रिशा, कार्ती, जयम रवी, प्रकाश राज आणि शोभिता धूलिपाला यांच्या मुख्य भूमिका आहेत. चोल साम्राज्यावर आधारित या सिनेमाला प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान याने संगीत दिले आहे. नुकतेच सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला होता, ज्याला चाहत्यांची जोरदार पसंती मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अर्रर्र! प्रितमने ढापलंय ‘केसरिया’ गाणं? ट्विटरवर चाहत्याचा प्रश्न; नेटकऱ्यांकडून सोशलवर मीम्सचा महापूर

अभिनेता नाही, तर ‘डॉक्टर स्ट्रेंज’ला बनायचे होते वकील, ‘या’ कारणामुळे भारतात घालवले एक वर्ष

ब्रेकिंग! प्रख्यात गझलकार, गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

हे देखील वाचा