मागील काही दिवसांपासून बॉलिवूडची ‘बेबो’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर खान ही प्रेग्नंट असल्याचे बोलले जात होते. लंडनमध्ये फिरायला गेलेल्या करीनाचे तेथील काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये तिचे बेबी बंप दिसू लागले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी अंदाज लावण्यास सुरुवात केली की, करीना प्रेग्नंट आहे. मात्र, आता या सर्व चर्चांना करीनाने पूर्णविराम लावण्याचे काम केले आहे. तिने स्वत: सोशल मीडियामार्फत तिच्या प्रेग्नंसीबाबत मोठा खुलासा केला आहे.
इतर अभिनेत्रींप्रमाणे करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिचादेखील सोशल मीडियावर चांगला मोठा वावर आहे. ती नेहमी तिचे मत व्यक्त करते, फोटो आणि व्हिडिओही शेअर करते. अशात नुकतेच करीना तिसऱ्यांदा आई बनणार असल्याच्या अफवा (Kareena Kapoor Khan Pregnancy Rumours) जेव्हा पसरल्या, तेव्हा नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर करीनासोबत सैफ, तैमूर आणि जेह यांचेही मीम्स व्हायरल केले. आता या बातम्यांवर करीनाने मौन सोडले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर प्रेग्नंसीबाबत सांगितले आहे.
करीनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “ते पास्ता आणि वाईन आहे मित्रांनो. शांत राहा… मी प्रेग्नंट नाहीये. उफ्फ… सैफचं म्हणणं आहे की, त्याने आधीच देशाच्या लोकसंख्येत खूप योगदान दिले आहे. मजा करा…” यासोबतच करीनाने यामध्ये हसणाऱ्या इमोजींचाही वापर केला आहे.

करीनाने मजेशीर अंदाजात तिच्या प्रेग्नंसीच्या अफवांना पूर्णविराम लावला आहे. आता करीनाच्या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की, करीना आई बनणार नाहीये. तसेच, ज्या बातम्यांनी जोर धरला होता, त्या फक्त आणि फक्त अफवा होत्या.
सैफ अली खान (Saif Ali Khan) हा चार मुलांचा वडील आहे. त्याला पहिली पत्नी अमृता सिंग (Amrita Singh) हिच्याकडून सारा अली खान (Sara Ali Khan) आणि इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) ही दोन मुले आहेत. तसेच, करीना कपूर खानसोबत लग्न झाल्यानंतर त्याला तैमूर अली खान (Taimur Ali Khan) आणि जेह अली खान (Jeh Ali Khan) ही मुले आहेत. विशेष म्हणजे, करीनाने प्रेग्नंसीमध्ये तिच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या आगामी सिनेमाची शूटिंग केली होती.
करीनाच्या आगामी कामाबाबत बोलायचं झालं, करीना आमिर खान (Aamir Khan) याच्यासोबत ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chaddha) हा सिनेमा पुढील महिन्यात ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-