Sunday, April 12, 2026
Home मराठी अबब! कार्तिकी गायकवाडच्या लहान भावाने वयाच्या २२ व्या वर्षी वडिलांना दिले ‘हे’ महागडे गिफ्ट

अबब! कार्तिकी गायकवाडच्या लहान भावाने वयाच्या २२ व्या वर्षी वडिलांना दिले ‘हे’ महागडे गिफ्ट

कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) ही मराठी संगीत क्षेत्रातील एक लोकप्रिय नाव आहे. आपल्या जादूई आवाजाने ती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असते. इतर सेलिब्रेटींप्रमाणे कार्तिकीही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सध्या तिचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिकीने तिच्या भावाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. काय आहे ही व्हायरल पोस्ट, आणि कशाबद्दल कार्तिकीने आपल्या भावाचे कौतुक केले आहे. चला जाणून घेऊ. 

कार्तिकी गायकवाडने सारेगमप लिटल चॅम्प मधून घराघरात लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या गोड आवाजाचे असंख्य चाहते सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण सध्या सोशल मीडियावर कार्तिकीची नव्हेतर कार्तिकीच्या भावाची सर्वात जास्त चर्चा होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे कार्तिकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने तिच्या लहान भावाने वडिलांना गाडी गिफ्ट दिल्याचे सांगत त्याचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

 

 

गायिका कार्तिकी गायकवाडचा भाऊ कौस्तुभ गायकवाड ही बहिणीप्रमाणेच उत्कृष्ठ गायक आहे. लहान वयात त्याने संगीत क्षेत्रात चांगली लोकप्रियता मिळवली आहे. नुकतीच कौस्तुभने आपल्या वडिलांसाठी म्हणजेच पंडित कल्याणजी गायकवाड यांच्यासाठी मर्सिडिज गाडी गिफ्ट केली आहे. या सुंदर क्षणाचा व्हिडिओ कार्तिकीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये कौस्तुभ कागदपत्रांवर सही करताना दिसत आहे. तर त्याचे वडील गाडीच्या शोरुममध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ कार्तिकीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

व्हिडिओसोबत कार्तिकीने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी माझ्या कौस्तुभ दादाने बाबांना मर्सिडिज भेट दिली असे म्हणत भावाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. कार्तिकीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून त्यावर त्यांच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा –

Anupamaa | निर्मात्यांवर नाराज झाले गौरव खन्नाचे चाहते, ट्रेड होतंय #AnujIsHope

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाच्या या मादक अदा पाहून व्हाल फिदा…!

‘या’ व्यक्तीवर संतापलीय राखी सावंत, रागाच्या भरात थेट केली लग्नाची घोषणा!

हे देखील वाचा