‘या’ व्यक्तीवर संतापलीय राखी सावंत, रागाच्या भरात थेट केली लग्नाची घोषणा!

0
98
Rakhi Sawant
Photo Courtesy: Instagram/rakhisawant2511

राखी सावंतला (Rakhi Sawant) बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हटले जाते. अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी ती आपल्या वक्तव्याने वाद निर्माण करते, तर कधी आदिलसोबत तिला कोणत्या ना कोणत्या कारणावरून ट्रोल केले जाते. अलीकडेच राखीचा बॉयफ्रेंड आदिलच्या एक्स गर्लफ्रेंडने अभिनेत्रीच्या प्रेमाला ढोंगी म्हटले होते. यावर संतप्त झालेल्या राखीने आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राखीला ‘खोटी’ म्हटली रोशिना
आदिलची एक्स गर्लफ्रेंड रोशिना देलावरी हिने नुकतेच राखी सावंतला ट्रोल केले होते. तिने राखी आणि आदिलच्या प्रेमावर प्रश्न उपस्थित केले. रोशिना म्हणाली होती की, तिची सर्व कृती केवळ मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी आहे. रोशिनाने राखी आणि आदिलच्या व्हिडिओवर कमेंट केली की, “मला समजत नाहीये की, एक महिला इतके खोटे कसे बोलू शकते आणि तिला त्याचे वाईटही वाटत नाही. हे केवळ प्रसिद्धीसाठी आहे का? (rakhi sawant talked about her wedding with boyfriend)

राखीने रोशिनाला ऐकवली खरी-खोटी
रोशिना दिलेल्या या वक्तव्यानंतर राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांना पॅपाराझींनी पाहिले आणि रोशिनाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर राखीने आधी आदिलला प्रश्न विचारला की, त्याचे तिच्यावर प्रेम आहे की नाही? यावर आदिल म्हणाला की, हो तो तिच्यावर प्रेम करतो. यानंतर चिडलेल्या राखीने रोशिनावर निशाणा साधताना म्हटलं, ‘तिची असं बोलण्याची हिम्मत कशी झाली’. ती पुढे म्हणाला, ‘रोशिना तू तुला पाहिजे तितके ट्रोल कर, आदिल माझा आहे. तू आमचं काहीही करू शकत नाहीस. भविष्यात आम्ही दोघे लग्न करणार आहोत.’ त्यानंतर राखीने रोशिनाला संदेश दिला की, तिने तिला आणि आदिलला त्रास देऊ नये.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here