सध्या सिनेजगतातील कलाकारांच्या वाढत्या आत्महत्या हा सर्वत्र चिंतेचा विषय ठरत चालला आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाबी गायकाच्या मृत्यूची बातमी ताजी असतानाच आता मल्याळम सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मल्याळम चित्रपटाचा लोकप्रिय अभिनेता सरथ चंद्रनचा (Sarath Chandran) मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या बातमीने मल्याळम सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असून अभिनेत्याने आत्महत्या केल्याचीही माहीती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, मल्याळम अभिनेता सरथ चंद्रनने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. केरळमील मलप्पुरम जिल्ह्यातील कक्कड गावी राहत्या घरी अभिनेत्याचा मृतदेह सापडला. मृतदेहासोबत सापडलेल्या सुसाईड नोटवरुन सरथ गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता, यामुळेच त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
सरथ चंद्रन हा फक्त ३७ वर्षीय तरुण अभिनेता होता. त्याने अंगमली डायरिज, कुडे आणि ओरु मेक्सिकन अपरथा अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर सरथ चंद्रनने अनेक जाहिरांतीमध्येही काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी सरथ सिनेसृष्टीत चर्चेत होता. अभिनेत्याचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग होता. त्याच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांसह कलाकारांवरही दुखःचा डोंगर कोसळला आहे.
सरथ चंद्रनच्या पश्चात आई वडिल आणि भाऊ असा परिवार आहे. अभिनेत्याच्या सुसाईड नोटमधून समोर आलेल्या माहितीनुसार माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नैराश्येतून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा खुलासा पोलिसांनी आपल्या प्राथमिक तपासातून केला आहे. अभिनेत्याच्या मृत्यूचे वृत्त समोर आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडिया वरुन शोक व्यक्त केला आहे. अभिनेता सरथ चंद्रनने अनिस्या या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.
हॉटनेसचा तडका! छोट्या पडद्यावरील अभिनेत्री पाण्यातच झाली बोल्ड, फोटोवर धडाधड पडला कमेंट्सचा पाऊस