सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाबाबत प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. या चित्रपटातून बिग बॉस फेम शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वी तो या चित्रपटाच्या शूटिंगमध्येही दिसला होता.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (salman khan) आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. या चित्रपटाबद्दल चाहते खूपच उत्सुक आहेत कारण अशी बातमी आहे की ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल याद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र, आता या चित्रपटाशी संबंधित नुकतेच वृत्त समोर आले आहे की, यामुळे शहनाजचे चाहते निराश होऊ शकतात.
माध्यमांच्या वृत्तानुसार,” कभी ईद कभी दिवाली” या चित्रपटाच्या निर्मात्यांनी बिग बॉस फेम शहनाज गिलला (Shehnaaz Gill) चित्रपटातून काढून टाकले आहे. असंही बोललं जात आहे की, शहनाज चित्रपटातून बाहेर पडताच तिने रागाच्या भरात सलमान खानला (Salman Khan)सोशल मीडियावर अनफॉलोही केले आहे.
भाईजानला अनफॉलो
माध्यामांच्या वृत्तानुसार सांगितले जात आहे की, सलमानला अनफॉलो केल्यानंतर दोघांमध्ये ही दुरावा निर्माण झाला होता. मात्र, या वृत्तांवर आतापर्यंत चित्रपटाच्या निर्मात्यांकडून आणि शहनाजकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
शहनाज चित्रपटात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे
एका वृत्तानुसारचं शहनाज गिल सुरुवातीपासूनच कभी ईद कभी दिवाली चा भाग आहे. सूत्रांच्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे की, शहनाज गिल ‘कभी ईद कभी दिवाली ‘मधून बाहेर पडलेली नाही. शहनाज या चित्रपटातून बाहेर पडण्याची बातमी खोटी आहे.
चित्रपटाचे शीर्षक खरेच बदलले आहे का?
सूत्रांच्या माहितीनुसार सांगितले की, अभिनेत्रीने या वर्षाच्या सुरुवातीला ‘कभी ईद कभी दिवाली ‘चे शूटिंग सुरू केले होते. या चित्रपटात तिची जोडी राघव जुयालसोबत (Raghav Juyal)आहे. या चित्रपटातून त्याचे बॉलिवूडमध्ये पदार्पणही होणार आहे. वृत्तानुसार, पलक तिवारी आणि सिद्धार्थ निगम हे देखील या चित्रपटाचे एक भाग असणार आहेत. माध्यमामधून बाहेर आलेल्या बातम्यानुसार, ‘कभी ईद कभी दिवाली’चे नाव बदलून ‘भाईजान’ करण्यात आले आहे. मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘माझी सेक्स लाईफ खूप…’ करण जोहरच्या शोमध्ये न जाण्याचे तापसी पन्नूने सांगितले विचित्र कारण
‘शाळेत असताना मुख्याध्यापकांनी थेट…’ बालपणीची आठवण सांगताना आमिर खानच्या डोळ्यात तरळले अश्रु
शूट आधी पंपिग मशीननं ब्रेस्ट मिल्क काढताना दिसली अभिनेत्री, व्हायरल फोटोवर होतोय कौतुकाचा वर्षाव