नोरा अन् राघवची मजा- मस्करी पाहून माधुरीही झाली लोटपोट; व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल


बॉलिवूड चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या डान्सने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे परदेशातून येऊन बॉलिवूडमध्ये आपली जागा बनवणारे कलाकार खूपच कमी आहेत. त्यातीलच एक म्हणजे नोरा फतेही होय. नोराने आपल्या डान्स स्टाईल आणि हटके एक्सप्रेशन्सने चाहत्यांना वेड लावले आहे. ती या इंडस्ट्रीमधील अशी अभिनेत्री आहे, जिने अद्याप मुख्य भूमिका साकारलेली नाही. मात्र, तिची लोकप्रियता ही कोणत्याही स्टार कलाकारापेक्षा कमी नाही. तिचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमीच आपल्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेचा विषय बनत असते. नुकतेच तिने एक रियॅलिटी शोचे परीक्षण केले होते. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून प्रेक्षकांना भलताच आवडला आहे. (Actress Nora Fatehi And Raghav Juyal Funny Video Madhuri Dixit Laughing Video Goes To Viral)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नोरा टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध शोपैकी एक असलेल्या ‘डान्स दीवाने ३’ शोच्या मंचावर उभी आहे. शोचे परीक्षक तुषार कालिया आणि माधुरी दीक्षितसोबत तिच्या परफॉर्मन्सने चार चाँद लावले होते. मात्र, आता शोचा होस्ट राघव जुयालसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही मजेशीर क्षणाचा आनंद घेत आहेत. त्यांची मजा- मस्करी पाहून माधुरीसह सर्वजण लोटपोट होतात.

एकीकडे राघव नोराला पाठीवर बसण्यास सांगतो. नोरा त्याच्या पाठीवर बसताच राघव तिला म्हणतो की, “ओ शेरावाली माता सांगितले नाहीये.” यानंतर शोचे परीक्षक तुषारदेखील त्या दोघांना साथ द्यायला जातो. या मजेशीर व्हिडिओवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नोराच्या कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर तिने सन २०१४ साली ‘रोर: टायगर ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत अनेक आयटम साँग्स दिले आहेत. त्यामध्ये ‘दिलबर दिलबर’, ‘ओ साकी’, ‘पछताओगे’, ‘एक तो कम जिंदगाणी’, ‘छोड देंगे’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.