Friday, April 19, 2024

‘शाळेत असताना मुख्याध्यापकांनी थेट…’ बालपणीची आठवण सांगताना आमिर खानच्या डोळ्यात तरळले अश्रु

आमिर खान (Aamir Khan) हा हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिकांनी त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी तो नेहमीच प्रचंड मेहनत घेतो म्हणूनच त्याला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. आमिर खानने सध्या बॉलिवूड जगतात आपले वर्चस्व सिद्ध केले असले तरी त्याने प्रचंड संघर्षाने हे स्थान मिळवले आहे. अलिकडेच आमिर खानने त्याच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या, ज्यावेळी तो चांगलाच भावूक झालेला दिसला. 

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने अलिकडेच एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटांचा उल्लेख केला. या मुलाखतीत आमिरने सांगितले की त्याला सिने जगतात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. यावेळी बोलताना तो म्हणाला की, “शाळेत असताना त्याला सहावीच्या वर्गासाठी सहा रुपये, सातवीमध्ये सात रुपये तर आठवीमध्ये आठ रुपये अशी फी होती. परंतु ही फी भरण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नसायचे त्यामुळे एकदा शाळेच्या मुख्याध्यापकांनी संपूर्ण शाळेसमोरच त्यांचे नाव घेत अपमान केला होता.” हा अनुभव सांगताना आमिर खानच्या डोळ्यात अश्रु तरळल्याचेही पाहायला मिळाले.

दरम्यान अभिनेता आमिर खानला घरातूनच सिनेसृष्टीचे बाळकडू मिळाले होते. कारण त्यांचे वडील ताहिर हुसैन चित्रपट निर्माते होते. त्यामुळेच बालपणापासून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दिला सुरुवात केली होती.  कयामत से कयामत तक हा आमिर खानचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. जो प्रचंड गाजला होता. यानंतर अभिनेता आमिर खानला एकापाठोपाठ एक चित्रपट मिळत गेले ज्यामुळे त्याने सिनेसृष्टीत आपली नवी ओळख निर्माण केली.

सध्या आमिर खान त्याच्या ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. प्रदर्शनाआधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला असून त्याला बॉयकॉट करण्याचीही मागणी होऊ लागली आहे.(laal singh chaddha actor aamir khan recalls his when his family failed to pay his school fees)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘झूठा’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी जोरजोरात रडली राखी सावंत म्हणाली, ‘मी संसाराची स्वप्न नाही पाहू शकत का?’

पडद्यावरचा बोल्ड अवतारही मिळवून देऊ शकला नाही बॉलिवूडमध्ये नाव, आज अनामिक आयुष्य जगतात ‘या’ अभिनेत्री

हे देखील वाचा