वैभव पल्हाडे (vaibhav palhade) हे नाव सध्या इंडस्ट्रीत सतत चर्चेत असतं. सध्या बहूचर्चीत असलेला अमेरिकन संगीतकार ‘TURN UP TOBI’ यांच्या ‘MPPOERRECORD’ या म्युझिक लेबल खाली १५ गाण्यांचा अल्बम तो दिग्दर्शित आणि संकलीत करणार आहे तसेच जगभर रिलीज करणार आहे. याचं कारण म्हणजे तो ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रातलं त्याचं अद्भुत काम. सध्या वैभव हा चित्रपट दिग्दर्शक, संकलक आणि संगीतकार आहे. तो सध्या कार्यरत असलेल्या प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतोय आणि सगळी जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळतोय
तो एक उत्तम चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक आहे. त्याने अनेक लघुपटांचं आणि चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. जगावर आलेलं कोरोनाचं संकटही वैभवला थांबऊ शकलेलं नाही. लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्याने एक शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली. त्याने दिग्दर्शित केलेले काही चित्रपट म्हणजे “थोडीशी लिटिल लिटिल”, “ना जाने क्यूं”, “आय एम पोरस”, “पत्रा”, “ईरा”, “Joel’s Diary
आय एम पोरस या लघुपटामुळे दिग्दर्शन क्षेत्रातल्या त्याच्या कामाला विलक्षण ओळख मिळाली. ‘आय एम पोरस’ आणि ‘द लास्ट डोअर’ या चित्रपटांसाठी त्याला दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalake) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2019 साठी नामांकनही मिळालं. तसंच त्याला डॅडी देशमुख शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट एडिटर चा पुरस्कार मिळाला. आय एम पोरस लघुपटाला आशा फिल्म फेस्टिव्हल नाशिकमध्ये 8 नामांकनं मिळाली.
त्याचा आगामी मराठी फीचर चित्रपट ज्यामध्ये तो लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम करतोय तो म्हणजे “७२ रूपयांचा पाऊस”. तसेच त्याने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक आणि VFX डिझायनर म्हणून काम केलं आहे. त्याचं प्रत्येक काम अद्वितीय आणि कौतुकास्पद आहे. त्याच्या प्रत्येक कामात प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळा आणि मंत्रमुग्ध करून टाकणारा फॅक्टर असतो. वैभव हा तरुण असूनसुद्धा दीर्घकाळ इंडस्ट्रीत काम करत असल्यामुळे प्रेक्षकांना काय पाहायला आवडेल हे त्याला बरोबर माहीत आहे.
वैभवचं चित्रपटसृष्टीत असलेलं योगदान त्याला नवी ओळख देऊन जातं. त्याच्या कामामुळे त्याला असंख्य चाहते मिळालेत जे त्याच्या नवीन कामासाठी नेहमीच आतुर असतात. तो संगीत क्षेत्रातही हुशार असल्यामुळे त्याचं संगीत तरुणांमध्ये व्हायरल होतं. “सिटी गर्ल्स याह”,”इश्क रीलोडेड” हे त्याचे प्रचंड व्हायरल झालेले साऊंडट्रॅक्स आहेत आणि “सुनवाली”, “येस आय एम एलिजिबल” आणि “ट्रान्स शेव्ड” हे त्याचे काही लवकरच रिलीज होणारे साउंडट्रॅक आहेत.
अव्वल दर्जाच्या चित्रपट-निर्मात्यांमध्ये आणि संगीत कलाकारांच्या नावात ज्या व्यक्तीचं नाव येतंय, तो वैभव फक्त 24 वर्षांचा आहे. तो आपल्यासारखाच एक साधा मुलगा आहे. पण हा साधा मुलगा बहु-प्रतिभावान लोकांपैकी एक आहे. लहानपणापासूनच सर्जनशीलता आणि अभिव्यक्तीच्या जगाकडे त्याची ओढ आहे. आपण कुठला मार्ग निवडणार आहोत यावर आधीपासूनच ठाम असल्याने वैभवला योग्य दिशेने सतत प्रेरणा मिळत गेली आणि तो मार्ग म्हणजे “चित्रपटांच दिग्दर्शन, लेखन” आणि “संगीताचा” मार्ग.
वैभवला त्याच्यातील कौशल्यं विकसित करायची होती आणि त्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचं होतं, त्याच्या खोलवर जायचं होतं, त्या क्षेत्रात त्याने पुढे जाऊन अनेक कोर्स केले आणि आता तो त्यात चांगला तयार झालाय. वैभव निश्चितच आपल्या देशातल्या तरुणांसाठी एक प्रेरणास्थान आहे!
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
घाईघाईत जॅकेटची चैन लावायला विसरली, कॅमेऱ्यासमोरचं दिशा पटानीची झाली फजिती
एका चित्रपटासाठी घ्याचे अमरिश पुरी तब्बल एवढी रक्कम, वाचून तुमच्या ही उंचातील भुवया
स्ट्रगलचे दिवस आठवून दिव्यांका त्रिपाठीची व्यथा; म्हणाली की, ‘मेकर्स म्हणायचे, तुला कोणी पाहणार नाही’










