संपूर्ण जगात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या खास प्रसंगाचे औचित्य साधून सगळे महिलांना शुभेच्छा देत असतात. सोबतच त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान आणि महत्त्व स्पष्ट करत असतात. यानिमित्ताने अनेक बॉलिवूड कलाकारांनी पोस्ट केल्या आहेत. अशातच बॉलिवूडची अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने महिला दिनानिमित्त एक खास ट्वीट केले आहे. जे सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घालत आहे.
उर्मिला मातोंडकरने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक महिला बैलगाडी चालवत आहे, तर दुसरी महिला स्कुटी चालवत आहे. या फोटोला शेअर करत तिने असे ट्वीट केले आहे की, “ती गर्दीच्या मागे नाही धावत, तर ती गर्दीला स्वत:च्या मागे यायला लावते. संपूर्ण जगभरातील स्त्री शक्तीला माझा प्रणाम. आपण स्वत:साठीच एक मोठी ताकद आहोत.” तिच्या या ट्विटला लाईक आणि कमेंटचा अक्षरश: वर्षाव होताना दिसत आहे.
She doesn't follow the crowd, rather she makes the crowd follow –#HappyWomensDay #womenempowerment #womenpower
दुनियाभर की स्त्री-शक्ती को बहुत सारा प्यार और प्रणाम ❤
हम खुद हमारी सबसे बड़ी ताकत है ????????✊#महिलादिवस #महिला_दिवस #स्त्रीशक्ती #अंतर्राष्ट्रीय_महिला_दिवस pic.twitter.com/4QDM85cxOJ— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) March 8, 2021
उर्मिला मातोंडकर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. समाजातील अनेक मुद्दे आणि प्रसंग यावर ती तिचे मत व्यक्त करताना नेहमीच दिसत असते. तिने बॉलिवूडपासून ते राजकारण पर्यंतचा प्रवास खूप मेहनतीने आणि चिकाटीने केला आहे.
‘नरसिंह’ या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘रंगीला’, ‘चमत्कार’, ‘बेदर्दी’ यांसारख्या चित्रपटात काम केले. उर्मिलाने हिंदी चित्रपटासोबतच मल्याळम, तेलुगु आणि मराठी चित्रपटामधून देखील आपले नाव कमावले आहे. तिने आता राजकारणात प्रवेश केला असून ती शिवसेना या पक्षात सामील झाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राखी सावंत बनली ‘नागिन’, पाहा प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेत्रीचा अवतार
-‘ग्रीक गॉड’ ऋतिक रोशनचे आलिशान घर पाहून तुम्हीही व्हाल थक्क, एकदा पाहाच