यावर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स‘ हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. १५ ते २० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने ३०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले होते. विवेक हे त्यांच्या याच सिनेमामुळे मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. ते बॉलिवूडपासून ते राजकारणात होणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर निर्भीडपणे वक्तव्य करत आहेत. मात्र, यावेळी ते वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे खूप मोठे काहीतरी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी स्वत:ला आणि कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याला छोट्या शहरातील मध्यमवर्गीय आऊटसायडर सांगितले आहे. कार्तिकने या फोटोत चेक शर्टसोबत पांढऱ्या रंगाचा टी शर्ट परिधान केला आहे. तसेच, विवेक अग्निहोत्री यांनी काळ्या रंगाचा टी शर्ट परिधान केला आहे.
‘दोन छोट्या शहरातील मध्यमवर्गीय लोक’
विवेक अग्निहोत्री आणि कार्तिक आर्यन (Vivek Agnihotri And Kartik Aaryan) हसताना आणि पोझ देताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत विवेक यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “दोन छोट्या शहरातील, मध्यमवर्गीय ग्वाल्हेरचे आऊटसायडर लोक, ज्यांनी स्वत:च्या जीवावर स्वत:ची ओळख बनवलीय. जर तुम्ही तरुण भारतीय असाल, तर एका अत्यंत प्रतिभावान व्यक्तीकडून प्रेरित आहात.”
View this post on Instagram
‘दिल्ली फाईल्स’मध्ये एकत्र?
विवेक आणि कार्तिक यांच्या या फोटोवर चाहते जोरदार कमेंटचा वर्षाव करत आहेत. एकाने लिहिले की, “पुढील सिनेमासाठी कार्तिकला घ्या.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “या जोडीला पुढील सिनेमाची गरज आहे.” आणखी एकाने लिहिले की, “मला वाटते की, काहीतरी मोठे होणार आहे. हाहाहा.” दोघांवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. एकाने लिहिले की, “२०२२मधील सर्वात यशस्वी चित्रपट निर्माता आणि सर्वात यशस्वी अभिनेता.” दुसऱ्या एकाने विचारले की, “दिल्ली फाईल्समध्ये एकत्र काम करणार आहात का?”
विवेक यांच्या पुढील प्रोजेक्टमध्ये कार्तिक?
विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ या यशस्वी सिनेमानंतर ‘दिल्ली फाईल्स’ बनवण्याची घोषणा केली होती. ट्विटरवरून त्यांनी याची माहिती दिली होती. या सिनेमाने बक्कळ पैसा छापला होता. दुसरीकडे, कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैय्या २’ या सिनेमानेही चांगला पैसा छापला. या सिनेमाने २०० कोटींचा आकडा पार केला होता. आता दोघेही एकत्र काम करताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमध्ये येण्यासाठी विजयने पाच पटींनी वाढवलं मानधन, अनन्या पांडे तर जवळपासही नाही
रणबीरच्या ‘त्या’ छोट्याशा कृतीने जिंकली चाहत्यांची मने, सर्वांसमोर धरले दाक्षिणात्य दिग्गजाचे पाय
बापरे! केबीसीच्या मंचावरच स्पर्धकाने शर्ट काढत मारली बायकोला मिठी, ‘अशी’ होती बिग बींची प्रतिक्रिया










