Saturday, February 14, 2026
Home बॉलीवूड आमिर खान अडचणीत! ‘लालसिंग चड्ढा’च्या अपयशानंतर गमावला बिग बजेट चित्रपट

आमिर खान अडचणीत! ‘लालसिंग चड्ढा’च्या अपयशानंतर गमावला बिग बजेट चित्रपट

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या दिवसेंदिवस अडचणीत येताना दिसत आहे. आमिर खानचा लालसिंग चड्ढा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. ज्याला बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावरुन होताना दिसत होती. या बॉयकॉट ट्रेंडमुळेच आमिर खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला. हा चित्रपट फ्लॉप झाल्याने टिकेचा धनी ठरत असलेल्या आमिर खानने एक मोठा बिग बजेट चित्रपटही गमावल्याची माहिती समोर आली आहे. 

दिवंगत भजन सम्राट आणि टी सिरीजचे मालक गुलशन कुमार यांच्यावरील बायोपिकसाठी आमिर खानचे नाव निश्चित करण्यात आले होते. तशी जोरदार चर्चाही माध्यमांमध्ये रंगली होती. मात्र आता याबाबतची मोठी माहिती समोर आली असून आमिर खान या चित्रपटात दिसणार नसल्याचे निश्चित झाले आहे.

हेही वाचा –

धक्कादायक! विमानतळावरुन अभिनेत्री निमरत कौरचे सामान चोरीला, ट्विट करत दिली माहिती
‘टॉलिवूड स्टोरी विकते तर बॉलिवूड स्टार्स विकते’, अभिनेते अनुपम खेर यांचे वक्तव्य चर्चेत
नाव न घेता उर्वशीने पुन्हा एकदा साधला रिषभ पंतवर निशाणा; म्हणाली, तुझी इज्जत वाचवली’

हे देखील वाचा