रामायण चित्रपटामुळे रणबीर कपुर आणि यश हे दोघंही चर्चेत आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा हा चित्रपट भव्य प्रमाणात तयार होत आहे. चित्रपटात रावणाची भुमिका साकारणारा यश, या चित्रपटाचा सह निर्माताही आहे. त्यामुळे तो चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सतत दिसत आहे. आणि नुकत्याच हैदराबादमध्ये झालेल्या एका प्री रिलीज कार्यक्रमादरमान्यान यशने प्रेक्षकांना एक विशेष आवाहन केले ते म्हणजे चित्रटाच्या VFX मध्ये चुका काढण्याऐवजी, त्यामागील विचारप्रक्रिया समजुन घेतली पाहीजे. त्याने निर्माता नमित मल्होत्रा यांची प्रशंसाही या वेळी केली.
19 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये एक कार्यक्रम झाला आणि या दरम्यान अभिनेता म्हणाला की. रामायण हा केवळ एक चित्रपट नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटाला एक नवीन ओळख मिळवून देण्याचा एक मोठा प्रयत्न आहे. त्याने प्रेक्षकांना मोकळ्या मनाने चित्रपट पाहण्याचे आणि त्याच्या तांत्रिक बाबींमधील किरकोळ चुका शोधणे टाळण्याचे आवाहन केले. निर्माता नमित मल्होत्रा यांची प्रशंसा केली आणि भारतीय चित्रपटाला जागतिक स्तरावर नेण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीला पाठिंबा दिला.
रामायण (Ramayan) हा चित्रपट 5 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरात रीलीज होणार आहे.. रणबीर कपुर प्रभु रामाच्या, साई पल्लवी सीतेच्या, यश रावणाच्या, सनी देओल हनुमानच्या आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भुमिकेत दिसणार आहेत. आणि या चित्रपटासाठी प्रेक्षक आता आतुर झाले आहेत.
हेही वाचा
पत्नीच्या कॅन्सरच्या काळात नाना पाटेकरांनी दिली साथ, शिवाजी साटम यांनी सांगितल्या भावुक आठवणी










