अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. चित्रपटांव्यतिरिक्त सुष्मिता आपल्या कुटुंबालाही भरपूर वेळ देते. ती अनेकदा तिचे फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. सुष्मिता सेनने आपल्या लहान मुलीच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
सुषने लिहिले, “माझ्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अलिशा म्हणजे थोर, ज्याला देवाने संरक्षित केले आहे आणि जी देवाची देणगी आहे. अलीशाकडे हे सर्व आहे. तिच्या डोळ्यातल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा मी साक्षीदार आहे आणि मला तिचा अभिमान आहे. हे प्रेम आणि पवित्रता मला तिच्या आयुष्यात तिच्या कृतीतून दिसते. मी एक चांगली व्यक्ती आहे कारण मी अलिशाची आई आहे. सदैव आनंदी राहा, निरोगी राहा शोना,बहीण आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.”
हेही वाचा – मलायका आणि अरबाजच्या लग्नात अर्जुन कपूर होता १३ वर्षाचा, फोटो पाहिला का?
‘आता बॉयकॉट करु नका…’ व्हायरल व्हिडिओमुळे नेटकरी झाले ऋतिक रोशनवर फिदा
अटक वॉरंट आल्यानंतर सपना चौधरीचा व्हिडिओ व्हायरल; म्हणतेय, ‘आम्ही खानदानी गरीब…’