Thursday, March 12, 2026
Home मराठी एकच हृदय कितीवेळा जिंकशील रे.! स्वतःची संपत्ती गहाण ठेवून ‘सोनू सूद’ने केलीये गरजूंना मदत

एकच हृदय कितीवेळा जिंकशील रे.! स्वतःची संपत्ती गहाण ठेवून ‘सोनू सूद’ने केलीये गरजूंना मदत

लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात दिला, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, आता सोनूबद्दल एक माहिती समोर येत आहे, ज्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल अधिक आदर आणि प्रेम वाटू लागले आहे.

लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात दिला. सोनू सूदने कशाचीही पर्वा न करता लोकांना भरभरून मदत केली. त्यामुळे त्याचे कौतुकही झाले. मात्र, त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला? यावर संशयही व्यक्त केला गेला. परंतू, आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे सोनू सूदने एक-दोन नव्हे तर आपल्या तब्बल 8 मालमत्ता गहाण ठेवल्या असून त्यातून 10 कोटींचं कर्ज घेतलं आणि गरिबांना मदतीचा हात दिल्याची माहिती समोर येत आहे

  • सर्व मालमत्ता जुहूतील असल्याची माहिती…

लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या अडचणी पाहून अस्वस्थ झालेल्या सोनूने त्याच्या एकूण आठ मालमत्ता गहाण ठेवल्या. त्यातून त्याने 10 कोटी रुपये उभे केले आणि लोकांना सढळ हाताने मदत केली. जुहू येथील पॉश आणि हायप्रोफाईल परिसरातील 8 मालमत्ता त्याने गहाण ठेवल्या असल्याचे आता बोलले जात आहे.

Sonu Sood
Sonu Sood

दोन दुकाने आणि फ्लॅट ठेवले गहाण

मनी कंट्रोल या वेब पोर्टलने याबाबतची माहिती दिली आहे. जुहू येथील दोन दुकाने आणि सहा फ्लॅट त्याने गहाण ठेवले आहेत. ही दोन्ही दुकाने तळमजल्यावर आहेत. तर शिवसागर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत त्याचे फ्लॅट आहेत. ही सोसायटी इस्कॉन मंदिराजवळील ए. बी. नायर रोडवर आहे.

पत्नीची मालमत्ताही ठेवली गहाण

आठ मालमत्ता गहाण ठेवून त्याबदल्यात त्याने बँकेकडून 10 कोटीचे कर्ज घेतले आहे. दस्ताऐवजानुसार त्याने 10 कोटींचं कर्ज घेण्यासाठी पाच लाख रुपये नोंदणी शुल्कही भरलं आहे. यातील काही मालमत्ता त्याची पत्नी सोनालीच्या नावावरही आहेत. मात्र, सोनूकडून याबाबतचा अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

संयुक्त राष्ट्र संघाकडून सन्मान

दरम्यान, सोनूच्या विशेष कार्याची दाखल संयुक्त राष्ट्र संघानेही घेतली आहे. महामारी काळात समाजकार्य केल्याबद्दल सोनू सूदला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमात (यूएनडीपी) विशेष मानवतावादी कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हे देखील वाचा