Wednesday, February 4, 2026
Home बॉलीवूड शेताच्या बांधावरुन आलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीने असे रोवले चित्रपटसृष्टीत भक्कम पाय

शेताच्या बांधावरुन आलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीने असे रोवले चित्रपटसृष्टीत भक्कम पाय

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या दिवसात आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूपच चर्चेत आहेत. त्यांची पत्नी आलिया हीने घटस्फोटासाठी केलेला अर्ज मागे घेऊन पुन्हा एकदा त्याच्यासोबत आयुष्य जगण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अश्याप्रकरे त्यांचं आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत होण्याची चर्चा सगळीकडे सुरु झाली आहे. याआधी देखील त्यांनी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.

नवाजुद्दीन यांचा जन्म 19 मे 1974 मध्ये मध्यप्रदेशमधील कस्बे बुढाणा येथे झाला. जवळपास 15 वर्षांच्या कठीण परिश्रमानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले. एक प्रसिद्ध अभिनेता असलेले नवाजुद्दीन हे आजही त्यांच्या गावी जाऊन शेती सांभाळतात.

नवाज यांच्या करीयरची सुरूवात 1999 मध्ये आलेल्या ‘सरफरोस या चित्रपटातून झाली. या चित्रपटात त्यांचा अगदी छोटासा रोल होता. जो अनेकांच्या लक्षात देखील आला नाही. 2012 पर्यंत त्यांनी अनेक छोट्या मोठ्या चित्रपटात काम केले. परंतु त्यांना ओळख मिळाली नाही. नंतर त्यांनी अनुराग कश्यप यांच्या ‘गँग ऑफ वासेपूर’ या चित्रपटात फैजल नावाची भूमिका साकारली. ही भूमिका इतकी गाजली की नवाज यांना लोकं अभिनयातील एक खणखणीत नाणं समजू लागले.

https://www.instagram.com/p/Bv1iOd3ADRW/?utm_source=ig_web_copy_link

नवाज यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की, “मी माझ्या गावला जात असतो.तिथे माझी शेती आहे, त्या शेतीची देखभाल करतो. तिथे जाऊन काही दिवस शेती केली की, माझ्या मनाला समाधान मिळते. आणि पुन्हा एकदा नव्याने नवीन पात्र निभवण्यास सज्ज होतो.”

नवाज यांना सात भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांच्या घरात चित्रपटाचे नाव घेणे म्हणजे चुकीचं समजलं जातं असे. असेही म्हणू शकता की, आयुष्याचा संघर्ष एवढा मोठा होता की, चित्रपटाबाबत विचार करायला त्यांना कधी वेळ मिळालाच नाही. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाने खूप शिकावे, तशी इच्छा त्यांच्या वडिलांची देखील होती, पण नक्की काय करावे हे त्यांना माहीत नव्हते.

आलेल्या आर्थिक परिस्थितीला तोंड देत त्यांनी कसे तरी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नोकरीसाठी ते दोन वर्ष इकडे तिकडे भटकत राहिले. बडोद्यामधील पेट्रोलियम कंपनीत त्यांनी दीड वर्ष नोकरी केली परंतु ते काम जरा धोकादायक होते. वेगवेगळ्या केमिकलचे टेस्टिंग तिथे होत असे. कालांतराने त्यांनी ती नोकरी सोडून दिली. त्यानंतर ते दिल्लीला गेले. तिथे अनेक ठिकाणी नोकरी केली. एक वेळ तर अशी आली होती की, त्यांना वॉचमनची नोकरी देखील करावी लागली.

एवढं करूनही त्यांना त्यांच्या मनासारखे काम नाही मिळाले. एक दिवशी ते त्यांच्या एका मित्रासोबत नाटक बघायला गेले होते. त्यानंतर त्यांच्यावर नाटकाची जादू चढू लागली. मग त्यांनी स्वतःलाच ही गोष्ट सांगितली की, यार ही तर तीच गोष्ट आहे जी तू मनापासून करू शकतो. काही दिवसांनी ते नाटकात काम करु लागले. हळूहळू तिथून पैसे मिळायला लागले आणि तिथून पुढे त्यांच्या करियरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शिक्षणाने इंजिनीअर असलेली अभिनेत्री रितू वर्मा आहे चेन्नई सुपर किंग्जची कट्टर फॅन, जाणून घ्या तिचा हटके प्रवास

-साठच्या दशकातील ‘चॉकलेट हिरो’, ज्याचे संपूर्ण कुटुंब होते चित्रपट उद्योगात

-तबला वादनासोबतच चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे उस्ताद ‘झाकीर हुसेन’

-श्रीदेवीशी केले गुप्तपणे लग्न, एकेकाळी होता नक्षलवादाशी संबंध; वाचा मिथुन चक्रवर्तींचे न ऐकलेले किस्से

हे देखील वाचा