चित्रपटांमध्ये खलनायक नसल्यास चित्रपट बेचव आणि कंटाळवाणे वाटू लागतात. त्याचबरोबर जर आपण बॉलिवूडबद्दल बोललो, तर हिंदी चित्रपटात खलनायकाला जेवढे महत्त्व दिले जाते तेवढेच खलनायिकेलाही दिले जाते. त्या काळात हेलन, बिंदू अशा अभिनेत्रींना चित्रपटांचे प्रसिद्ध व्हँप म्हणजेच खलनायिका म्हटले जायचे. या सर्व खलनायिका चित्रपटांतील नायक- नायिकांवरुद्ध कट रचत असत, त्याचसोबत ते त्यांच्या ग्लॅमरस लुकने प्रेक्षकांचे मनही जिंकायच्या. हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक खलनायिका होऊन गेल्या आहेत, ज्या त्यांच्या पात्रांसाठी अजूनही आठवल्या जातात.
अरुणा इराणी
जेव्हा प्रसिद्ध खलनायिकांबद्दल बोलले जाईल, तेव्हा अभिनेत्री अरुणा इराणी यांचे नाव निश्चितच घेतले जाईल. त्यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1992 मध्ये अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितच्या ‘बेटा’मधील त्यांच्या नकारात्मक भूमिकेसाठी त्या अजूनही आठवल्या जातात. सावत्र आई बनलेल्या अरुणा इराणीने त्यांच्या पात्राला अमरत्व दिले.
मोना डार्लिंग उर्फ बिंदू मोना
सत्तर आणि ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटांचे ते युग आले, ज्यात नायिकेसोबतच खलनायिकाही महत्त्वपूर्ण भूमिका साकारू लागल्या. अभिनेत्री बिंदू यांची याच काळात एंट्री झाली. अल्पावधीतच त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी बऱ्याच चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
हेलन
वयाच्या 19 व्या वर्षी हेलन यांना ‘हावडा ब्रिज’ चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला. या चित्रपटाच्या ‘मेरा नाम चिन चिन चू’ गाण्याने हेलनचे नशीब बदलले. यानंतर त्या बॉलिवूडची पहिल्या ‘आयटम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. हेलन त्यांच्या डान्ससह सौंदर्यासाठीही ओळखल्या जातात. हेलनची बरीच पात्रं आजही आठवली जातात. मात्र, हेलन बर्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहेत.
पद्मा खन्ना
दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ चित्रपटात कैकईची भूमिका साकारणारी अभिनेत्री पद्मा खन्ना, यांनी 80 च्या दशकात अनेक चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. मात्र, लग्नानंतर पद्मा यांनी चित्रपटांना निरोप दिला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अगं बाई!! ‘या’ अभिनेत्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलीय स्त्रीची भूमिका; ‘भाईजान’चाही समावेश










