Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

उर्फीने प्री-बर्थडे सेलिब्रेशनवर परिधान केला ‘हा’ आगळा वेगळा ड्रेस; चाहते म्हणाले, ‘हिला जंगलात…’

‘बिग बॉस ’ फेम उर्फी जावेद  तिच्या फॅशन आणि स्टाइल सेन्ससाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिच्या आवडत्या पोशाखांनी नेटिझन्सला आकर्षित करते. ती अनेकदा तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. अलीकडेच उर्फीचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर प्रंचड व्हायरल हाेत आहे. ज्यात अभिनेत्री प्री-बर्थडे पार्टीमध्ये  अतिशय बोल्ड अवतारात आहे.

उर्फी जावेद (urfi javed) हिच्या या व्हिडिओने साेशल मीडियावर खळबळ उडवली आहे. उर्फी प्री-बर्थडे पार्टीमध्ये अशा प्रकारे पोहोचली की, तेथील लाेक तिला पाहतच राहिले. उर्फी जावेदचा 15 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे, यानिमित्ताने तिने 12 तारखेला इंडस्ट्रीशी संबंधित मित्रांसोबत प्री-बर्थडे पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये उर्फी धाग्यांनी बनलेला एक अतिशय बोल्ड ड्रेस परिधान करून आली होती. या प्री-बर्थडे पार्टीमध्ये उर्फीने केक कापला आणि मित्रांना खाऊ घातला, पॅपराजींनीही अभिनेत्रीला आगाऊ शुभेच्छा दिल्या, यावेळी अभिनेत्री खूप आनंदी दिसत होती पण सर्वांच्या नजरा उर्फीच्या या आगळ्या वेगळ्या ड्रेसवर खिळल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या बाेल्ड ड्रेसमध्ये उर्फी जावेद फारच हाॅट दिसत हाेती तर सर्व कॅमेरा उर्फीला कॅप्चर करत  हाेते. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने पीच रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि सिंपल मेकअप करत केसांचा अंबाडा बनवला आहे. उर्फीचे हा लेटेस्ट व्हिडिओ साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे उर्फी जावेदला पुन्हा ट्राेलरला सामोरे जावे लागले आहे. अनेक युजर्सने अभिनेत्रीला तिच्या वाढदिवशी असे कपडे घालू नकाे अशी विनंती केली. नेटिझन्सनी अभिनेत्रीच्या फॅशन सेन्सला कचरा म्हटलं आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की,”कोणीतरी हिला जंगलात साेडून या”, तर दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, “उर्फीचा हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक अवतार आहे.”

या नवीन लूकसह उर्फी कॅमेरासमोर तिचा ड्रेस फ्लॉंट करताना दिसली, तिने फोटोसाठी पोज देताना तिची टोन्ड फिगर फ्लॉंट केली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याआधी उर्फी ब्रॅलेटमध्ये एअरपोर्टवर पोहोचली होती. तिच्या त्या बाेल्ड लूकवर युजरने तिला खूप ट्रोल देखील केले हाेते. अशात उर्फी तिच्या वाढदिवशी काय परिधान करणार आहे हे बघण्यासाठी चाहते उत्साही आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
पॅपराजींवर संतापली कियारा आडवाणी, वृद्धांसोबत घडलेल्या प्रकाराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
बापरे! 46 वर्षीय अभिनेत्यासाेबत राेमान्स करताना दिसली 28 वर्षीय अभिनेत्री; म्हणाली, ‘ये दिल तुम बिन…’

हे देखील वाचा