वादग्रस्त विधान करणाऱ्या व्यक्तीला चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींच्याही रोषाचा सामना करावा लागतो. मग तो व्यक्ती कोणीही असो. असेच काहीसे उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांच्यासोबत घडले आहे. त्यांनी असा कधी विचारही केला नसेल की, मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर त्यांच्या एका वक्तव्यामुळे इतका गोंधळ उडेल. फाटलेली जीन्स घालणाऱ्या तरुण वर्गावर केलेल्या विधानासाठी, आता त्यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या वादग्रस्त विधानावर, अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदानंतर, आता अभिनेत्री गुल पनाग हिनेही मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
वास्तविक, मुख्यमंत्री तीरथसिंग रावत हे देहरादून येथे एका कार्यशाळेत उपस्थित होते. या दरम्यान, महिलांनी रीप्ड जीन्स घालण्याबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केले आणि म्हणाले, “आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालतात, काय हे सर्व ठीक आहे? हे कसले संस्कार आहेत? मुलांवर कसे संस्कार आहेत, हे त्यांच्या पालकांवर अवलंबून असते.”
यावर गुल पनागने दोन ट्वीट केले. पहिल्या ट्विटमध्ये तिने लिहिले, “फाटलेली जीन्स काढा.” नंतर दुसऱ्या ट्विटमध्ये तिने स्वत:चा आणि मुलीचा फोटो शेअर केला. या फोटोत गुल पनाग आणि तिच्या मुलीने रीप्ड जीन्स परिधान केलेली दिसत आहे. या फोटोत तिने पिवळे, तर मुलीने निळे टी-शर्ट घातले आहेत.
#RippedJeansTwitter pic.twitter.com/zwitZiIE9k
— Gul Panag (@GulPanag) March 17, 2021
गुल पनागच्या या ट्विटवर बरेच युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “ही खूप आरामदायक असते?” यावर गुल पनागने उत्तर दिले, “ही 11 वर्षांपूर्वीची जुनी जीन्स आहे. त्यामुळे ती खराब झाली आहे. फाटलेली विकत घेतली नाही.”
These are 11 years old. Thus worn out .
Not bought ripped ????????♀️— Gul Panag (@GulPanag) March 17, 2021
याव्यतिरिक्त, गुल पनागसह बऱ्याच महिला युजर्स ट्विटरवर रीप्ड जीन्समध्ये आपले फोटो शेअर करत आहेत. आज सकाळपासून ट्विटरवर ‘हॅशटॅग रीप्ड जीन्स ट्विटर’ (#RippedJeansTweeter) ट्रेंड होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-गदरमध्ये ज्याने सनी-अमिषाच्या मुलाची भूमिका केली आता तोच होणार गदर दोनचा हिरो, पाहा कोण आहे ‘तो’










