Thursday, March 19, 2026
Home बॉलीवूड कार्तिक आर्यन झाला कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट शेअर करत दिली माहिती; वाढले तब्बूच्याही हृदयाचे ठोके

कार्तिक आर्यन झाला कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट शेअर करत दिली माहिती; वाढले तब्बूच्याही हृदयाचे ठोके

कोरोना व्हायरसने पुन्हा तोंड वर काढले आहे. या व्हायरसच्या तावडीत सामान्य व्यक्तींपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत अनेकजण सापडताना दिसत आहेत. अशातच आता आणखी एक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा अभिनेता इतर कोणी नसून कार्तिक आर्यन आहे. कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘भूल भुलैया’ या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या दरम्यान त्याने कोरोना पॉझिटिव्ह असल्याची पोस्ट शेअर केली आहे, जे पाहून त्याचे चाहते अस्वस्थ झाले आहेत.

कार्तिकने प्लसचे चिन्ह पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मी पॉझिटिव्ह झालो आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा.” चाहते कार्तिकच्या प्रकृतीमुळे चिंतेत आहेत आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी ते प्रार्थनाही करत आहेत. मात्र, कार्तिक पॉजिटिव्ह आला असल्यामुळे, ‘भूल भुलैया’चे काम थांबवले आहे.

कार्तिक कोविड पॉझिटिव्ह आल्यामुळे तब्बूच्या हृदयाचे ठोके वाढणार आहेत. खरं म्हणजे, कोविडच्या भीतीमुळे तब्बू भूल भुलैयाच्या सेटवर येत नव्हती. परंतु त्यानंतर काही दिवसांपूर्वीच ती शूटिंगसाठी सेटवर आली होती. मात्र, कार्तिक कोविड पॉझिटिव्ह असल्याने तब्बूलाही आता स्वतः बद्दल भीती वाटायला लागली असेल.

खरं तर, काही दिवसांपूर्वी कार्तिकने चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो कियारा, तब्बू आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत दिसला होता. फोटो शेअर करत कार्तिकने लिहिले होते की, “तब्बूजींचे परत स्वागत आहे, परंतु या बबलमधून बाहेर येण्यास त्यांनी नकार दिला आहे. तब्बूने स्वत:चा पोर्टेबल झेड प्लस बायो बबल आणला आहे.”

काही दिवसांपूर्वी ‘भूल भुलैया’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित होईल. तसेच, ही रिलीजची तारीख नाही, तर कार्तिकच्या परीक्षेची तारीख आहे. कारण चित्रपटाच्या आधीच्या भागात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता आणि अक्षयने या चित्रपटात धमाल केली होती. अक्षयची कॉमेडी प्रेक्षक आणि समीक्षकांना इतकी आवडली की, हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता पाहावे लागेल की, कार्तिकही तशीच धमाल करू शकेल की नाही.

कार्तिकचा या वर्षाचा हा पहिला चित्रपट आहे. कार्तिकच्या ‘दोस्ताना 2’ आणि ‘धमाका’ या आगामी चित्रपटाच्या रिलीज डेटची अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. ‘दोस्ताना 2’ मध्ये जान्हवी कपूर कार्तिकसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा- 

-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा

-‘या’ अभिनेत्याचे ट्रान्स्फॉर्मेशन पाहून तुम्ही व्हाल थक्क, केले तब्बल १८ किलो वजन कमी

-नादच खुळा! यूट्यूबवर १०० कोटी व्ह्यूजचा टप्पा पार करणारी पहिली युवा गायिका; ‘या’ दोन गाण्यांनी बनवला विक्रम

हे देखील वाचा