बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी ती चर्चेत येण्याचे कारण काही नवीनच आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली मलायका नुकतीच फुले चोरताना दिसली आहे. स्वतः ही चोरी स्वीकारून, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे आणि सांगितले की, तिने एक सुंदर फुले चोरली आहेत.
मलायकाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहतेही तिचा हा फोटो लाईक करुन शेअर करत आहेत. त्याचबरोबर बॉलिवूड स्टार्सही मलायकाच्या पोस्टवर कमेंट्स करत हसत आहेत.
फोटो शेअर करत अभिनेत्रीने हसणार्या इमोजीसह कॅप्शनमध्ये लिहिले होते, “फूल चोर… वसंत आला आहे. फोटोमध्ये आपण पाहू शकता की, तिने तोंडाला मास्क लावले असून, ती राखाडी स्लीव्हलेस टी-शर्टमध्ये आणि शॉर्टसमध्ये दिसत आहे. एका हातात कात्री, तर दुसर्या हातात फुलांचा गुच्छा घेऊन ती कारमध्ये बसताना दिसली आहे.
फोटोत मलायकाच्या बॅकग्राऊंडमध्ये बरीच फुले दिसत आहेत. हा फोटो पाहून अक्षय कुमारची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने रेड हार्ट इमोजी बनवून कमेंट केली आहे. त्याचवेळी, सोशल मीडिया युजर्स मलायकाला ‘फुल चोर’ म्हणून कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिले की, “हृदयाचे बरेच तुकडे तुकडे झाले.”
मलायका बर्याचदा इंस्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो शेअर करत असते. अलीकडेच अभिनेत्रीने तिचा हॉट व्हिडिओ आणि फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या मोनोकनीमध्ये दिसली. या फोटोत मलायकाने तिची बॅक साइड दाखवली होती.
मलायकाच्या लेटेस्ट व्हिडिओबद्दल बोलायचे झाले, तर मलायका जिममध्ये ठुमके लावताना दिसली होती. हॉट पॅन्ट्स आणि क्रॉप टॉपमध्ये ती हॉट डान्स करत होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पांढऱ्या रंगाच्या चादरमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसली टॉपलेस, फोटो शेअर करत म्हणतेय ‘वो पहला प्यार’
-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा